आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेक इन इंडिया दुर्घटनेनंतर पुनावालाचे वादग्रस्त ट्विट, लोकांनी घेतला समाचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईमध्‍ये सध्‍या चालू असलेल्‍या 'मेक इन इंडिया वीक' मध्‍ये रविवारी सायंकाळी सांस्‍कृतिक कार्यक्रमांदरम्‍यान आग लागली. या घटनेनंतर कॉंग्रेस समर्थक तहसीन पूनावालाने ट्विटरवर 'मेक इन इंडिया' ला 'फेक इन इंडिया' म्‍हणत मोदी सरकार विरोधात काही ट्विट केले. त्‍यामुळे लोकांनीही त्‍यांना चांगलेच धारेवर धरले व ट्विटरच्‍या माध्‍यमातून
त्‍यांच्‍यावर जोरदार हल्‍ला केला. तहसीनने काय केले ट्विट..
-या दुर्घटनेनंतर तहसीनने ट्विटरवर लिहीले, "मेक इन इंडियाचे आगीत नुकसान झाले, मोदी भक्तांच्‍या लवकरच लक्षात येईल की, हे फेक इन इंडिया आहे."
- या ट्विटनंतर तहसीनवर शेकडो लोकांनी ट्विटरवरून हल्‍ला केला.
- त्‍यानंतर त्‍यांनी माफी मागून लोकांच्‍या सुरक्षेसाठी प्रार्थना केली.
कोण आहे तहसीन..
-तहसीन पूनावाला पुण्यातील एक बिझनेसमन आणि कॉंग्रेस समर्थक आहेत.
- रॉबर्ट वढेरा यांची चुलत बहिण मोनिकासोबत काही दिवसांपूर्वी त्‍यांचे लग्‍न ठरले आहे.
- प्रियंका आणि रॉबर्ट फॅमिली या लग्‍न सोहळ्यात उपस्‍थित होती.
- तहसीन टीव्‍हीवरील वादविवादात कॉंग्रेसचे समर्थन करताना दिसतात.
- पेज थ्री पार्टीं आणि फॅशन मासिकांमध्‍येही ते दिसतात.
- 2010 मध्‍ये दिल्लीत झालेल्‍या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्‍या आयोजन कमिटीमध्‍ये ते सल्‍लागार होते.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, तहसीन आणि मोनिकाचे फोटो, सोबत ट्विटवरील कमेंट..