आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजस एक्सप्रेसमधील विषबाधा झालेले सर्व प्रवासी सुखरूप; 26 जणांना झाले होते फुड पॉयझनिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेजसमधील विषबाधा झालेले प्रवाशी. - Divya Marathi
तेजसमधील विषबाधा झालेले प्रवाशी.
मुंबई- तेजस एक्सप्रेसमध्ये अन्नातून विषबाधा झालेले सर्व प्रवासी सुखरुप असल्याचे सांगण्यात येत आहे. सुमारे 26 जणांची तब्येत यामुळे बिघडली होती. या सर्वांना स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. तर तेजस एक्स्प्रेस चिपळूण स्थानकावर थांबवण्यात आलेली आहे. 
 
तेजस एक्स्प्रेस ही देशातील सर्वात वेगवान एक्स्प्रेस आहे. तेजस एक्स्प्रेस दर रविवारी करमाळीहून सीएसएमटीकडे रवाना होते. आजही तेजस आपल्या नियोजित वेळेप्रमाणे मुंबईच्या दिशेने निघाली. मात्र चिपळूणच्या जवळपास पोहोचताच अनेक प्रवाशांना त्रास जाणवू लागला. ज्यांना त्रास जाणवू लागला अशांची संख्याही मोठी होती. अन्नातून विषबाधा झाल्याचे लक्षात येताच तेजस चिपळूण स्टेशनवर थांबवण्यात आली. प्रवाशांना तातडीने चिपळूण शहरातील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...