आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजस एक्सप्रेसमध्ये ऑम्लेटमधून विषबाधा; रेल्वेकडून दोन अधिकारी निलंबित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- तेजस एक्सप्रेसमध्ये ऑम्लेटमधून विषबाधा झालेले 26 जणांची प्रकृती बिघडली होती. त्यांना उलट्या झाल्या होत्या. परिणामी तेजस गाडी चिपळून रेल्वे स्टेशनवर थांबवण्यात आली होती. विषबाधा झालेल्या प्रवाशांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्व प्रवाशी सुखरुप असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, या प्रकरणाची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेत दोन अधिकार्‍यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.

तेजस एक्स्प्रेस ही देशातील सर्वात वेगवान एक्स्प्रेस आहे. तेजस एक्स्प्रेस दर रविवारी करमाळीहून सीएसएमटीकडे रवाना होते. आजही तेजस आपल्या नियोजित वेळेप्रमाणे मुंबईच्या दिशेने निघाली. मात्र चिपळूणच्या जवळपास पोहोचताच अनेक प्रवाशांना त्रास जाणवू लागला. ज्यांना त्रास जाणवू लागला अशांची संख्याही मोठी होती. अन्नातून विषबाधा झाल्याचे लक्षात येताच तेजस चिपळूण स्टेशनवर थांबवण्यात आली. प्रवाशांना तातडीने चिपळूण शहरातील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे आणखी फोटो..
बातम्या आणखी आहेत...