आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुरुंगात 500 रुपये भाड्याने मिळते बॅरेक; 24 तास अंधार्‍या खोलीत अनुभवता येते गुन्हेगाराचे जीवन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- तुरुंगातील जीवन कसे असते? तुरुंगात कैदी काय खातात. त्यांना कशाप्रकारचे जेवण मिळते? हे आता तुम्हालाही अनुभवता येणार आहे. यासाठी तुम्हाला एखादा गुन्हा करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही 500 रुपये देऊन 24 तास तुरुंगाची हवा खाऊ शकतात. 

तेलंगाणामधील संगारेड्डी तुरुंग प्रशासनाने एक अखोना उपक्रम सुरु केला आहे. तुरुंगात राहाण्यास इच्छूक व्यक्तीला 24 तासांसाठी एक कोठडी उपलब्ध करून देण्यात येईल.

216 वर्षे जुना तुरुंग...
 - मेडक जिल्ह्यातील संगारेड्डी तुरुंगाची इमारत 1796 मध्ये हैदराबादचा निझाम अली खान यांनी बांधली होती. सुरुवातीच्या काळात येथे घोड्यांचा तबेला होता. ब्रिटीशांनी नंतर या इमारतीत तुरुंग सुरु केले होते.
- 216 वर्षे जुन्या तुरुंगात आता म्युझियम सुरु आहे. पर्यंटकांसाठी ते खुले करण्‍यात आले आहे. म्युझियममध्ये निझामशाहीच्या काळातील ऐतिहासिक वस्तू ठेवण्यात आल्या आहे.

तुरुंगात राहाण्यासाठी हा नियम...
- तुरुंगात एंट्री केल्यानंतर आधी फिटनेस टेस्ट रिपोर्ट गेटवर जमा करावे लागले.
- 500 रुपये शुल्क दिल्यानंतर नोंदणी करावा लागतो. सोबत आपल्या जवळ असलेल्या सर्व वस्तू जमा कराव्या लागतात.
- तुरुंगात खादीचा ड्रेस परिधान करण्यास दिला जातो. स्टीलचे ताट, अंघोळीनेसाठी पाणी, साबण आणि झोपण्यासाठी बिस्तर उपलब्ध करून दिला जातो.
- कैदी क्रमाकासोबत 24 तासांसाठी बॅरेक अलॉट केले जाते.
- येथे येणारा व्यक्तीचा 24 तासांसाठी संपूर्ण जगाशी संपर्क तुटतो.

216 वर्षे जुना तुरुंगाचे इतर फोटो पाहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा....
बातम्या आणखी आहेत...