आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाेटबंदीचा देवालाही फटका; मुंबईतील भाविकांची संख्या निम्म्याने घटली!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एकीकडे सुट्या पैशाची चणचण, तर दुसऱ्या बाजूला नाेटा बदलण्यासाठी रांगेत वेळ जात असल्यामुळे गेल्या अाठवड्यात मुंबईतील प्रमुख मंदिरे, मशिदीत येणाऱ्या भाविकांची संख्या काहीशी घटल्याचे दिसून येते. श्री सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी, मुंबादेवी, इतकेच नाही तर हाजी अली दर्ग्यावरील भाविकांची संख्याही राेडावली असून त्यामुळे पूजा साहित्य बाजारालाही मोठा अार्थिक फटका बसला आहे.

‘सिद्धिविनायक’ संकष्टीलाही रिकामे
सिद्धिविनायक मंदिरात दरराेज सरासरी ३० ते ४० हजार भाविक येतात; परंतु गेल्या अाठवड्यात ही संख्या दहा हजारांपर्यंत घटली. दर संकष्टी चतुर्थीला या मंदिरात सरासरी एक ते सव्वा लाख भाविक येत असतात. मात्र, मागील गुरुवारच्या चतुर्थीला भाविकांची संख्या कमीच हाेती, अशी माहिती मंदिर न्यासाचे कार्यकारी संचालक संजीव पाटील यांनी दिली. या मंदिराच्या दानपेटीत दरराेज सहा लाख, तर अाठवड्याला ४५ लाख रुपये जमतात. मात्र, मागील अाठवड्यात शनिवारपर्यंत ही रक्कम २० लाखांच्या अातच हाेती.

पुढे वाचा, महालक्ष्मी मंदिरातही गर्दी विरळ....
बातम्या आणखी आहेत...