आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: न्यूयॉर्कपेक्षा मुंबई स्त्रियांसाठी सुरक्षित! 10 तास रस्त्यांवरुन फिरतांना एकही अभद्र कॉमेंट नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महिला आणि मुलींचे कपडे हे अत्याचाराचे कारण असल्याचे अनेकवेळा तार स्वरात सांगितले जाते. मात्र, IndieTube ने मुंबईतील रस्त्यावर तयार केलेल्या व्हिडिओने या चर्चा वायफळ गप्पा असल्याचे दाखवून दिले आहे. तर, दुसरीकडे काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर असाच एक व्हिडिओ तयार करण्यात आला होता, तेव्हा त्या युवतीवर अभद्र कॉमेंटचा भडीमार झाल्याचे पाहायला मिळाले होते.
Indietube ने तयार केलेल्या व्हिडिओमध्ये मुंबईच्या रहदारीच्या आणि समुद्र किनार्‍यावरील रस्त्यावरुन शॉर्ट स्कर्ट आणि टॉप परिधान केलेली युवती सलग 10 तास एकटी फिरते. या मुलीवर लोकांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यावरून मुंबई ही महिलांसाठी सुरक्षीत आहे, असे म्हणणे धाडसाचे होईल. परंतू मुंबईमध्ये महिला एकट्या फिरू शकतात, हे या व्हिडिओवरुन लक्षात आले आहे.
भारतामध्ये महिला अत्याचाराची घटना घडल्यानंतर एक गट कायम महिलांनी मर्यादेत राहायला हवे. त्यांचा पेहराव भडक असू नये, असे उपदेशाचे डोस पाजत असतो. व्हिडिओचे निर्माते Indietube ने You Tube वर व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले आहे, की आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा, शॉर्ट स्कर्ट आणि टॉप मधील मुलीवर येथील नागरिकांनी एकही अश्लिल टिप्पणी केली नाही. मुंबईकरांना याबद्दल सलाम केला पाहिजे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी शोशाना बी रॉबर्टस या युवतीवर न्यूयॉर्कमध्ये असाच व्हिडिओ चित्रित करण्यात आला होता. न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर दहा तासात शोशानाची अभद्र कॉमेंट करुन 100 वेळा छेडछाड केल्याचे Hollaback या संस्थेने म्हटले होते.

पुढील स्लाइडवर पाहा, Indietube आणि न्यूयॉर्कचा व्हिडिओ