आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tender Issued For The Shiv Memorial Jayant Patil

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवस्मारकासाठी जगभरातून निविदा माग‍ितल्या - जयंत पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित स्मारकासाठी जगभरातील वास्तुविशारदांना निमंत्रित करण्यात येणार आहे. त्याची जाहिरात दहा दिवसांत शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी दिली.


पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात गुरुवारी स्मारकासंबंधी बैठक झाली, यानंतर ते बोलत होते. जगभरातून प्राप्त होणा-या वास्तुविशारदांच्या संकल्पचित्रांपैकी उत्तम अशा काही संकल्प चित्रांची निवड करण्यात येईल. त्यांना शासनाच्या अपेक्षा सांगण्यात येतील. त्यातून जे संकल्पचित्र उत्कृष्ट ठरेल, त्याचा चित्राची आराखडा बनवण्यासाठी निवड करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले. अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांचे स्मारक हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ व्हावे. मुंबापुरी पाहायला येणा-या पर्यटकांचे ते खास आकर्षण ठरावे, असे भव्य स्मारक उभारण्याचा शासनाचा मानस आहे, असे पाटील म्हणाले. अरबी समुद्रात राजभवनपासून 1.2 कि.मी अंतरावर असलेल्या 16 हेक्टर (45 एकर) उभे केले जाणार आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांनी या स्मारकाला 20 जून रोजी तत्वत: मंजुरी दिली आहे. त्यामुळे स्मारकाच्या उभारणीतील महत्वाचा अडथळा दूर झाला आहे, असे पाटील यांनी सांगितले.