आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tendu Leveas Bide And Seal Do Gram Sabha Chief Wildlife Secreatary

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तेंदूपत्त्याचा लिलाव, विक्रीचा अधिकार ग्रामसभांना मिळणार - प्रधान वनसचिव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील तेंदुपत्त्याच्या उत्पादनाच्या लिलावाचा आणि विक्रीचा अधिकार आता ग्रामसभांना दिल्याची माहिती प्रधान वनसचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी दिली आहे. यामुळे या परिसरातील गावांना आता थेट लाभांश मिळणार आहे.

नक्षलग्रस्त गडचिरोली आणि गोंदियातील तेंदूपत्त्याच्या उत्पादनाचा लिलाव दरवर्षी वनविभागामार्फत केला जातो. तसेच यातून मिळालेली रक्कम सरकारी तिजोरीत जमा न करता ती संबंधित परिसरात राहणा-या आदिवासी नागरिकांच्या विकासासाठी खर्च केली जाते. गेल्यावर्षी सुमारे 83 कोटी रूपयांचा महसूल या माध्यमातून गोळा झाला होता. सरकारने ग्रामसभांना अधिकार देण्याचा कायदा 2006 मध्ये केल्यानंतर सामुदायिक वनहक्काच्या माध्यमातून वनजमिनीवरील उपक्रमांचे अधिकार ग्रामसभांना द्यावेत, अशी मागणी विदर्भ निसर्ग संरक्षण समितीने लावून धरली होती. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील 702 गावांच्या सामुदायिक वनहक्क आदिवासींना मिळाला असून सुमारे साडेतीन लाख एकर जमीनीचा हक्क मिळाला आहे. गेल्यावर्षी गोंदियातील सुमारे 250 गावांमधील बांबूविक्रीचा लिलाव ग्रामसभांच्या माध्यमातून केला गेला होता.