आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..मी सुदैवाने बचावलाे, तुम्ही काळजी घ्या, सचिनने सांगितला जिवावर बेतलेला प्रसंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने बुधवारी मुंबई रेल्वे पोलिसांच्या वतीने प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयक दोन नव्या योजनांचा शुभारंभ केला. रेल्वे रूळ न ओलांडण्याचे आवाहन करत सचिनने लहानपणी आपल्यावर बेतलेला थरारक प्रसंगही सांगितला.
मुंबई रेल्वे पोलिसांनी ‘समीप’ (सेफ्टी अलर्ट मेसेज एक्सक्लुझिव्हली फॉर पॅसेंजर्स) आणि ‘बी-सेफ’ या योजना सुरू केल्या. त्याच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात सचिन म्हणाला की, सचिन म्हणाला, मीही वयाच्या ११ ते १५ वर्षांपर्यंत लोकलमध्ये अवजड क्रिकेट किट सांभाळत धक्के खात प्रवास केलेला आहे. हे अनुभव आयुष्यभर माझ्या स्मरणात राहतील. दरवर्षी रेल्वेतून पडून ७०० प्रवासी, तर रूळ ओलांडताना १६०० प्रवाशांचा मृत्यू होतो. हे अत्यंत दुर्दैवी आहे. मला वाटते की आजच्या युगात प्रत्येक मिनिट मोलाचा असतो. तुमचे कुटुंब अाणि मित्र घरी तुमची वाट पाहत असतात. पण रूळ ओलांडून जाण्याऐवजी तुम्ही पाच मिनिटे उशिराने पोहोचलात तरी काही बिघडत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही सुखरूप आणि सुरक्षितपणे घरी पोहोचणे अावश्यक आहे, हॉस्पिटलमध्ये नव्हे. माझी तुम्हाला विनंती आहे की, रेल्वेत गर्दी असली तरी कृपया रेल्वेच्या छतावर बसून प्रवास करू नका. प्रत्येक जण घाईतच असतो. पण असा प्रकार करून जीव धोक्यात घालू नका, असेच माझे सांगणे आहे.
दोन्ही रुळांवर रेल्वे, मधल्या जागेत कसेबसे गुडघे टेकवून जीव वाचवला
शाळकरी वयात असताना रेल्वे रूळ ओलांडून जाताना बेतलेल्या जीवघेण्या प्रसंगाचा किस्साही सचिन तेंडुलकरने सांगितला. तो त्याच्याच शब्दांत...
शाळेत असताना मी एकदा विलेपार्लेतील मित्राकडे गेलो होताे. आम्ही पाच-सहा जणांनी सकाळी क्रिकेटचा सराव केला आणि दुपारी मित्राकडे जेवायला गेलो. नंतर आम्हाला चित्रपट पाहायची हुक्की आली. सरावासाठी जाण्यास उशीर झाल्याने आम्ही दादर स्थानकात दुसऱ्या फलाटापर्यंत जाण्यासाठी रूळ ओलांडू लागलो. अचानक सर्व रुळांवरून लोकल रेल्वे येत असल्याचे पाहिले. आमची गाळणंच उडाली. आम्ही क्रिकेट किटसह कसेबसे दोन्ही रुळांच्या मधील जागेत गुडघे टेकवून बसलो. यानंतर आयुष्यात कधीच रेल्वे रूळ ओलांडला नाही.
बातम्या आणखी आहेत...