आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tension In Bhiwandi Over The Unfair Text On Facebook

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेसबुकवरील आक्षेपार्ह मजकुराने भिवंडीत तणाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दोन धर्मीयांत तेढ निर्माण करणारा आक्षेपार्ह मजकूर ‘फेसबुक’वर टाकल्याने भिवंडी येथे बुधवारी दगडफेक होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अफताब हुसैन यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. इंटरनेट सर्फिंग करताना हुसैन यांना एका धर्माबाबत आक्षेपार्ह मजकूर टाकल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. या घटनेनंतर भिवंडी आणि शहरातील संवेदनशील भागांत बंदोबस्त वाढवण्यात आल्याचे ठाणे पोलिस आयुक्त के. पी. रघुवंशी यांनी सांगितले. दरम्यान याच कारणावरून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे जावेद अख्तर या संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.