आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक तेढ: लालबाग, परळ भागात उर्मट तरूणांचा राडा, पोलिसांवर हल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ईद-ए-मिलादच्या निमित्ताने काढलेल्या धार्मिक जुलुसावरून परतणा-या काही तरूणांनी लालबाग-परळसह गिरणगावात धार्मिक तेढ वाढीला लागेल असे कृत्य केले. टारसायकलवरून ट्रिपलसीट येणा-या टोळक्यांनी महिलांची छेडछाड केली. तसेच ‘अल्ला हो अकबर’चे नारे देत संबंधित तरुणांनी भारतमाता येथे ड्युटीवर असलेल्या पोलिसांवर हल्ला केला. दरम्यान, या तरूणांना बेदाम चोप दिल्याने रात्री उशिरापर्यंत या भागात प्रचंड तणाव होता. आता मात्र, स्थिती पूर्ण नियंत्रणात आहे.
हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त आझाद मैदान येथे मुस्लिमांचा जुलूस निघाला होता. तेथून परतणा-या काही उर्मट तरूणांनी गिरणगाव परिसरात राडा केला. वाहतुकीचे नियम तोडून मोटारसायकलवरून अनेक तरूण ट्रिपलसीट आले होते. त्यांनी फटक्यांच्या माळा रस्त्यावर पेटवल्या व काही महिलांची महिलांची छेडछाड केल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान, या मुजोरीपणाच्या विरोधात पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी हुज्जत घातली तर एका वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच लालबाग, परळ या मराठी वस्तीतील लोकांनी या तरूणांना चांगलाच चोप दिला. हा राडा तीन-चार तास चालला होता. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ठिकठिकाणी लाठीमार केला.
या घटनेचे वृत्त कळताच पोलीस आयुक्त राकेश मारिया घटनास्थळी दाखल झाले. मारियांनी पोलिसांच्या जादा तुकड्या आणि धडक कृती दलाचे जवानांना पाचारण करून तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री 12 पर्यंत पूर्ण स्थिती नियंत्रणात आणली गेली.