आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorist Abu Jindal Eating To Khima, Chicken Malai At Mumbai Jail

अबू जिंदालला तुरुंगात‍ दररोज मिळतोय खिमा आणि च‍िकन रोल मलाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आरोपी सईद जबीउद्दीन अंसारी उर्फ अबू जिंदाल याला तुरुंगात दररोज खिमा, चिकन रोल आणि मलाईची मेजवानी मिळत आहे. अजमल कसाबप्रमाणेच तुरुंग पोलिसांकडून अबू जिंदालचे चोचले पुरवले जात आहेत.
रमजान महिना सुरू असल्यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये म्हणून जिंदालच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलिसांकडून त्याची प्रत्येक फर्माईश पूर्ण केली जात आहे. कसाबप्रमाणेच अबू जुंदालचीही तुरुंगात मेजवानी मिळत आहे.
अबूला दररोज एक लिटर दूध, एक किलो सुका मेवा, एक ग्रॅम मलई, एक प्लेट भेजा फ्राय, एक पीस चिकन रोल, एक प्लेट कबाब देण्यात येत आहे. याव्यतिरिक्त त्याला समोसा, मालपोवा, फिरनी आदी गोडधोड खाऊ घातले जात आहे, असे वृत्त एका इंग्रजी सायं दैनिकात प्रसिद्ध झाले आहे.
2009 मध्ये तुरुंगात आलेल्या अजमल कसाबने मटन बिर्यानीची डिमांड केली होती. तुरुंगात मिळणारे जेवन त्याच्या घशाखाली उतरत नसल्याचे त्याने सांगितले होते.
प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मुंबईतील काला चौकीत कैद असलेला जिंदाल दररोज सकाळी खजूर, दूध, मलाई, कीमा आणि भेजा फ्राईची डिमांड करतो. त्याची ही व्यवस्था करणे फारच कठीण होऊन बसले आहे. परंतु, काय करणार आम्ही कोणाच्या धार्मिक भावना दूखवू इच्छीत नाही. मग तो दशहतवादीही असला तरी चालेल. जिंदालसाठी खाद्य पदार्थ आणण्‍यासाठी एका कॉन्स्टेबलला पाठवले जाते. काही वेळा तर कॉन्स्टेबलला भिंडी बाजार, मोहम्मद अली रोडपर्यंत जावे लागते. तर काही वेळा चौकीजवळच असलेल्या मुस्लिम समुदायाकडून व्यवस्था करून घेतली जाते. विशेष म्हणजे जिंदालसाठी आणलेले जेवन जास्त तिखट असणार नाही, याची खास काळजी घेतली जाते, अशी माहिती नाव न प्रसिद्ध करण्‍याच्या अटीवर एका एटीएस अधिकार्‍याने दिली आहे.
बीडच्या 'टेरर हब'ची अजूनही धास्ती; गुप्तचरांची कायम नजर
अबू जिंदाल हा अबू हमजा नव्हेच!
कसाब-जबीला समोरासमोर आणण्याचे प्रयत्न
कसाब म्हणतो, मुंबईवरील 26/11चा कट पाकमध्येच