आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorist Afazal Usmani's Mumbai Police Investigation

फरार होणे पूर्वनियोजित नव्हते; अफझल उस्मानीचा चौकशीत जबाब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आरोपपत्र दाखल करण्याच्या दिवशी फरार होण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता, असे इंडियन मुजाहिदीनचा अतिरेकी अफझल उस्मानी याने पोलिसांना जबाबात सांगितले.

20 ऑगस्ट रोजी उस्मानीला न्यायालयात हजर करण्यात येत होते. या वेळी त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केले होते. त्यानंतर दोन महिन्यांनी ‘एटीएस’ त्याला नेपाळ सीमेवरून अटक केली होती. फरार होण्याचा कोणताही पूर्वनियोजित कट रचला नव्हता. त्या दिवशी केवळ संधी मिळाली म्हणून आपण फरार झालो. तसेच दोन महिन्यांच्या कालावधीत मुजाहिदीनच्या कोणत्याही सदस्याशी संपर्क साधला नाही, असे त्याने सांगितले. विसंगत उत्तरे देणे ही आयएमची खासियत आहे. त्यामुळे एटीएस त्याने दिलेल्या जबाबावर विसंबून न राहता त्याची आणखी सखोल चौकशी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. उस्मानी फरार झाल्यानंतर एटीएसने त्याचा भाचा जावेदला अटक केली. गुजरात व मुंबईत तुरुंगात असताना जावेदने अनेकदा उस्मानीची भेट घेतली होती. तसेच त्याला फरार करण्यात मदत केल्याचेही समोर आले होते. 2008 मध्ये अहमदाबाद व सूरत येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात उस्मानीचा सहभाग होता.