आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorist Attack May On Mumbai, Spy Agency Warning

मुंबईवर अतिरेकी हल्ल्याची शक्यता, गुप्तचरांचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारतभेटीच्या पार्श्वभूमीवर मुंबईवर दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असा इशारा केंद्रीय गुप्तचर विभागाने दिला आहे. हल्ल्यासाठी दहशतवादी भारतात दाखल झाल्याचेही त्यात म्हटले आहे. यामुळे मुंबईसह देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असून २६/११ पेक्षा मोठा दहशतवादी हल्ला मुंबईवर होण्याची शक्यता या अलर्टमध्ये असून, मुंबई पोलिस सतर्क झाले आहेत. २८ जानेवारीच्या आधी हे हल्ले होण्याची शक्यता आहे.

मुंबईत सार्वजनिक ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. जमात-उद-दावा, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहंमद व हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांनी देशाच्या विविध भागात हल्ल्यांसाठी चार गट केले आहेत. महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि ओडिशामध्ये हल्ले होण्याची शक्यता आहे. या गटांच्या म्होरक्यांची नावेही कळाली असून, मुंबईवर हल्ल्याची जबाबदारी अब्दुल्ला अल कुरेशी, नासीर अली, जावेद इक्बाल, मोबीद झेमन आणि समशेर यांच्यावर असल्याची माहिती आहे.

मंगळवारी सिद्धिविनायक मंदिरात गर्दी असते. दादरच्या पोलिसांनी मंदिर ट्रस्टसोबत बैठक घेतली आहे. मंदिर परिसर व दादर भागांत भाड्याने राहणा-या भाडेकरूंची चौकशी सुरू केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिका-याने दिली आहे.