आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत भारतील टॉपच्‍या दहशतवादी संघटना; ओलांडली क्रुरतेची सीमा, जगभर दहशत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 26 नोव्हेंबर 2008 हा दिवस मुंबईसाठीच नव्‍हे तर संपूर्ण जगासाठी काळा दिवस होता. भारताची आर्थिक राजधानी असलेल्‍या मुंबईवर या दिवशी सर्वात मोठा दहशतवादी हल्‍ला झाला. यात 34 विदेशी नागरिकांसह 197 जण ठार झाले, तर 800 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. अशाच प्रकारचा हल्‍ला सहा दिवसांअगोदर फ्रान्‍सची राजधानी पॅरिसवर झाला. या दोन्‍ही हल्‍ल्‍यात बरेच साम्‍य आहे. भारतात सध्‍या 65 दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. त्‍या सर्वांवर बंदी आहे. यातील भारतात सक्रिय असलेल्‍या काही कुप्रसिद्ध दहशतवादी संघटनांविषयी हा खास वृत्‍तांत...
दहशतवाद म्‍हणजे काय ?
आपल्या राजकीय मागण्या जबरदस्तीने मान्य करून घेण्यासाठी विशिष्ट समूहात आत्यंतिक भीती निर्माण करण्याच्या हेतूने एखादी व्यक्ती किंवा गट यांनी प्रस्थापित सत्तेच्या बाजूने किंवा विरोधात चालविलेला हिंसाचार किंवा निर्माण केलेला धाक म्हणजे दहशतवाद होय, अशी व्‍याख्‍या जॉन क्रेटम या विचारवंताने केली आहे. आज राष्‍ट्रीय आणि आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर अनेक दहशतवादी संघटना आहेत.
दहशतवादी संघटना निर्माण होण्‍याची कारणे
>> राजनैतिक मार्गाने उद्दिष्टे साध्य होत नाहीत म्हणून शत्रू राष्ट्रावर मात करण्यासाठी दहतवाद अंगीकारला जातो.
>> मूलतत्त्ववादी व धार्मिक कट्टरवादी दशतवादाद्वारे आपल्या उद्दिष्टांचा व धार्मिक तत्त्वांचा अंगीकार करू इच्छितात.
>> छोट्या राष्ट्रांना बड्या राष्ट्रांबरोबर युद्ध करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने दहशतवादाचा मार्ग त्यांना सोईचा ठरतो.
>> लष्करी सामर्थ्य वाढविण्यापेक्षा दहशतवादास पाठिंबा देणे सोपे असते. उदाहरणार्थ पाकिस्तानचा काश्मीरमध्ये चालू असलेला सरकार पुरस्कृत दहशतवाद.
>> वाढते नागरिकीकरण व शहरीकरण यामुळे होणारा त्रास
पुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्‍या, भारतातील दहशतवादी संघटनाबद्दल...