आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्फोटानंतरही अतिरेक्यांचा सहा महिने मुंबईत मुक्काम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मागील वर्षी 13 जुलै रोजी मुंबईत बाँबस्फोट घडवल्याचा संशय असलेले दोन पाकिस्तानी नागरिक बाँबस्फोटांनंतर तब्बल सहा महिने भायखळा येथे राहत असल्याची धक्कादायक माहिती इंटेलिजन्स ब्युरोच्या (आयबी) तपासातून समोर आली आहे. महाराष्ट्राचे दहशतवादविरोधी पथक आरोपींच्या तपासासाठी जंग जंग पछाडत असताना अतिरेक्यांची ही दुकली मुंबईतच राहिल्याचे समजल्यामुळे तपासयंत्रणा हैराण झाल्या आहेत.
डिसेंबरच्या सुरुवातीला दोघेही अतिरेकी पाकिस्तानात पळून गेले. त्यांना भायखळ्यात जागा मिळवून देण्यासाठी मदत करणाºया सुलतान मिर्झा नामक व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 13 जुलैच्या बाँबस्फोटांचा सूत्रधार यासीन भटकळ असल्याचा पोलिसांचा संशय आहे. मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये भटकळ मुंबईत आल्याचा सुगावा पोलिसांना लागला असून त्यानेच या दोन अतिरेक्यांना घर मिळवून देण्यासाठी 60 हजारांची अनामत रक्कम भरली. या दोघा अतिरेक्यांची नावे बकस आणि तवरेझ आहेत. रुबिना नामक महिलेने त्यांना राहण्यासाठी घर दिल्याचे आयबीतील सूत्रांनी सांगितले.
अधिक माहिती मिळवण्यासाठी मिर्झाची चौकशी सुरू आहे. इंडियन मुजाहिदीनचे सहा सदस्य दिल्ली पोलिसांच्या जाळ्यात सापडल्यानंतर या दोन अतिरेक्यांनी पाकिस्तानात पोबारा करण्याचा निर्णय घेतला. मुजाहिदीनचा म्होरक्या असणाºया भटकळने या दोघांना व रुबिनाला आपला परिचय इम्रान या नावाने करून दिला होता. या तिघांनी बाँबस्फोट घडवण्याची ठिकाणे निश्चित करण्यासाठी जागेची शोधाशोध केल्याचे सूत्राने सांगितले. जव्हेरी बाजारातील एका जिममध्येही ते नियमितपणे जात होते.
> 13 जुलै 2011 रोजी दादर, ऑपेरा हाऊस व झवेरी बाजारात स्फोट. 26 जण ठार तर शंभर जण जखमी.
> इंडियन मुजाहिद्दीनचा हात, दिल्ली, चेन्नईमधून सात संशयितांना अटक.
> अजूनही मुख्य सूत्रधार शोधण्यात एटीएसला अपयश.