आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर फुटबॉलच्या बहाण्याने एकत्र आले हे ठाकरे बंधू, आदित्य-अमित ठाकरेंची भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे कधी एकत्रित येतील हे निश्चितपणे सांगता येणार नाही. पण, अखेर ठाकरे घराण्याची नेक्स्ट जनरेशन एकत्रित आली आहे. याला निमित्त होते, शनिवारी रात्री झालेले फुट्सल लीग... आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी लोअर परळमधील सेंट रेजिस हॉटेलमध्ये एकमेकांची भेट घेतली. यावेळी या ठाकरे बंधूंनी अर्धा-पाऊण तास चर्चा केली. यानंतर दोघांनी एकत्रित जेवणही केले.

फुट्सल लीगचे आयोजन अमित ठाकरेंनी केले होते. या स्पर्धेसाठी आलेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंना भेटण्याची इच्छा आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली होती. त्यानुसार आदित्य त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. आदित्य ठाकरे हे मुंबई डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. तर फुट्सल लीग ही फुटबॉल स्पर्धा अमित ठाकरेंची संकल्पना आहे. अमित ठाकरे स्वत: फुटबॉलपटू आहेत.
बातम्या आणखी आहेत...