आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • THACKERAY MEMORIAL RUNS IN TROUBLE,Tehseen Poonawalla Will Going In SC

महापौर बंगला स्मारकाचा वाद पेटणार, तेहसीन पुनावाला सुप्रीम कोर्टात जाणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रस्तावित महापौर बंगल्यातील स्मारकाचा वाद येत्या काही आणखी उफाळण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे समर्थक तेहसीन पुनावाला यांनी महापौर बंगल्यातील होणा-या बाळासाहेबांच्या स्मारकाला विरोध केला आहे. तसेच आपण सुप्रीम कोर्टात जाणार आहोत अशी भूमिका जाहीर केली.
यासंदर्भात तेहसीन पुनावाला यांनी म्हटले आहे की, 5 जुलै 2013 रोजी सुप्रीम कोर्टाने आदेश काढले होते. यात सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, केंद्र व राज्य सरकारच्या मालकीच्या सर्व वास्तूत किंवा कोणत्याही सरकारी निवासस्थानावर नेत्यांची स्मारके उभारण्याची परवानगी दिली जाऊ नये. कोर्टाच्या या आदेशानंतर केंद्र सरकराने 18 ऑक्टोबर 2014 रोजी एक परिपत्रक काढून सरकारी निवासस्थानांचे स्मारकात रूपांतरित करण्यावर बंदी घातली आहे, असे पुनावाला यांनी सांगितले.
माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचं दोन महिन्यापूर्वी निधन झाले. त्यानंतर त्यांचे निवासस्थान स्मारकात रूपातंरित करावे अशी देशभरातून मागणी पुढे आली होती. मात्र, याच मोदी सरकारने सुप्रीम कोर्टाचा हवाला देऊन असं स्मारक उभारता येणार नाही असे म्हटले होते. आता तेच भाजप व सत्तेत सहभागी असलेले शिवसेना महापौर बंगल्यात बाळासाहेबांच्या स्मारकाला परवानगी कशी काय देते असा सवाल पुनावाला यांनी उपस्थित केला. बाळासाहेबांचे स्मारक जरूर बांधावे मात्र ते सरकारी निवासस्थानात नाही. त्यापेक्षा त्यांनी वास्तव्य केलेल्या मातोश्री निवासस्थान योग्य राहील असेही पुनावाला यांनी सांगितले. भाजपने सरकारने हा निर्णय रद्द करावा अन्यथा आम्ही या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाऊ असेही पुनावाला यांनी स्पष्ट केले.
भाजपचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनीच या जागेची जाहीर घोषणा केल्याने ते यातून कसा मार्ग काढतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, बाळासाहेबाच्या स्मारकाला कायदेशीर अडसर येणार असल्याचे स्पष्ट होत आहे.