आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेरीवाले 15 दिवसांत हटवा, अन्यथा मनसे बंदोबस्त करणार राज ठाकरेंचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेल्वे प्रवाशांच्या न्याय हक्कांसाठी सरकार व रेल्वे प्रशासनावर राग व्यक्ती करण्यासाठी मनसेने रेल्वे मुख्यालय चर्चगेटवर धडक मोर्चा काढला. - Divya Marathi
रेल्वे प्रवाशांच्या न्याय हक्कांसाठी सरकार व रेल्वे प्रशासनावर राग व्यक्ती करण्यासाठी मनसेने रेल्वे मुख्यालय चर्चगेटवर धडक मोर्चा काढला.
मुंबई - ‘पंधरा दिवसात रेल्वे पुलांवरील फेरीवाले हटवा अन्यथा मनसे त्यांचा बंदोबस्त करेल’, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी रेल्वे व्यवस्थापनाला दिला. तसेच रेल्वेच्या यंत्रणेत सुधारणा झाली नाही, तर आपला पुढचा मोर्चा शांततेच्या मार्गाने नसेल, त्यावेळी जो संघर्ष होईल त्याला प्रशासन जबाबदार असेल’, असा धमकीवजा इशाराही त्यांनी दिला. 
एल्फिन्स्टन स्थानकावरील चेंगराचेंगरीबाबत रोष व्यक्त करण्यासाठी आयोजित संताप मोर्चानंतर ते बाेलत हाेतेे.
 
या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही जोरदार टीका केली. मुंबईच्या सीएसएमटी स्टेशन परिसरातील मेट्रो सिनेमाजवळून सुरू झालेल्या या मोर्चाचे चर्चगेटला सभेत रुपांतर झाले. राज म्हणाले की,  माझ्यासह संपूर्ण देशाने मोदींवर विश्वास टाकला, पण त्यांनी विश्वासघात केला, म्हणून आमचा राग आहे. गुजरातच्या विकासाचे फसवे चित्र आपल्यासमोर उभे केले होते.  अच्छे दिन, काळा पैसा याबाबत मोदींनी दिलेल्या आश्वासनांचा संदर्भ देत राज म्हणाले, ‘भाजपमधल्या लोकांनाही हे सर्व खोटे असल्याचे आता कळतेय. रेल्वेच्या समस्या न समजणाऱ्या पीयुष गोयलना, निव्वळ ते मोदींच्या विश्वासातील आहेत म्हणून रेल्वेमंत्री केल्याचा आरोपही त्यांनी केला. भाषणाच्या शेवटी एल्फिन्स्टन दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली.
 
न्यायाधीशांना अावाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोंडसुख घेतानाच राज ठाकरे यांनी देशातील न्यायमूर्ती, नोकरशहा आणि संपादकांना सरकारच्या चुकीच्या निर्णयाला विरोध करण्याचे आवाहन केले. कोणतेही सरकार कायमस्वरूपी नसते, सरकारे येत जात असतात, त्यामुळे मोदींच्या नादी लागू नका, असेही ते म्हणाले.
 
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, आजच्या संताप मोर्चासंबंधी माहिती व छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...