आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरे बंधुंनी केले एकत्रीत जेवण; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज अाणि उद्धव ठाकरे म्हणजे राजकारणातील कायम चर्चित चेहरे. त्यांच्या भेटीच्याही अनेकदा बातम्या झाल्या अाहेत. मात्र या दाेघांनीही ‘वेगळी वाट’ कायम ठेवली. ठाकरे कुटुंबातील पुढची पिढी म्हणजेच आदित्य उद्धव ठाकरे आणि अमित राज ठाकरे ही चुलत भावंडे नुकतीच एकत्र अाली हाेती, निमित्त हाेते फुटबाॅल सामन्याचे.   
 
शनिवारी रात्री लोअर परळमधील सेंट रेजिस हॉटेलमध्ये या बंधूंची भेट झाली. या दाेघांत तीन िमनिटे  चर्चा झाली. एकत्रित जेवणसुद्धा घेतले. अमित ठाकरे याने मुंबईत प्रीमियर फुटबाॅल स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी रोनाल्डिनो, रायन गिग्ज असे नामांकित फुटबॉलपटू आले होते. त्यांना भेटण्याची इच्छा आदित्यने व्यक्त केली होती. त्यानुसार आदित्य कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आदित्य हे मुंबई डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, तर फुटबाॅल प्रीमियर लीगचे अायाेजक अमित अाहेत. 
बातम्या आणखी आहेत...