आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thakare Family Accept Tribute From Shiv Sainik By First Death Aniversary Of Balasaheb

बाळासाहेबांच्या प्रथम स्मृतिदिनी ठाकरे कुटुंबीय स्वीकारणार शिवसैनिकांचे अभिवादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पहिला स्मृतिदिन रविवारी आहे. या दिवशी दादरच्या शिवाजी पार्कवर जमणा-या हजारो शिवसैनिकांच्या अभिवादनाचा स्वीकार करण्यासाठी संपूर्ण ठाकरे कुटुंबीय पार्कवर उपस्थित असेल, अशी माहिती शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार झाले होते. तेथे रविवारी सकाळी 7 ते सायंकाळी 7 या काळात स्मृती उद्यानातील चौथ-यावर श्रद्धांजली अर्पण करता येईल. यासाठी राज्यभरातून हजारो शिवसैनिक येणार आहेत. या दिवशी शिवाजी पार्कवर कोणताही कार्यक्रम होणार नाही. तेथे कोणतेही व्यासपीठ नसेल तसेच भाषणे असणार नाहीत, असे देसाई म्हणाले. स्मृतीदिनाला शिवसेनेने कोणालाही निमंत्रण दिलेले नाही. त्यामुळे राज ठाकरे येणार की नरेंद्र मोद? या प्रश्नाला काही अर्थ नाही, आम्ही त्याची यादी केलेली नाही, असे देसाई यांनी स्पष्ट केले.
‘सीएम’पद ही राज्याला शिक्षाच
अननुभवी आणि संथ निर्णय घेणारे पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदी नेमून काँग्रेस पक्ष श्रेष्ठीने राज्याला कठोर शिक्षाच दिली आहे. पृथ्वीराज यांच्या तीन वर्षांच्या राज्यातील कारभाराची नोंद इतिहासात नसेल, असा दावा देसाई यांनी केला. इतर ठिकाणी चटई क्षेत्र देऊन कॅम्पाकोलाचा प्रश्न राज्य शासनाला पूर्वीच सोडवता आला असता, परंतु त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी जराही इच्छाशक्ती दाखवली नाही, असा आरोपही देसाई यांनी केला.