आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीसाठी पुन्हा याचिका, कुटुंबीयांतील वाद वाढला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीवरून ठाकरे कुटुंबीयांतील वाद अाणखी वाढत चालला अाहे. बाळासाहेबांचे ज्येष्ठ पुत्र जयदेव ठाकरे यांनी अापले बंधू शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविराेधात मुंबई उच्च न्यायालयात नव्याने तक्रार दाखल केली अाहे. अापण बाळासाहेबांचे वारसदार असल्याने त्यांच्या संपत्तीवर अापलाही अधिकार असल्याचा जयदेव यांचा दावा अाहे. या प्रकरणी पुढील महिन्यात सुनावणी हाेण्याची शक्यता अाहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्रात सर्वाधिक संपत्ती उद्धव यांच्या नावाने करण्यात अालेली अाहे. इतर सदस्यांनाही वाटा देण्यात अालेला अाहे, मात्र जयदेव यांच्या नावे काहीच हिस्सा देण्यात अालेला नाही. त्यामुळे जयदेव यांनी मृत्युपत्रावरच संशय व्यक्त करून यापूर्वी न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. त्यावर काेणताही निर्णय न झाल्याने त्यांनी अाता ३१ डिसेंबर २०१५ राेजी उच्च न्यायालयात उद्धव ठाकरे व कुटुंबातील तिघांविराेधात नव्याने तक्रार दाखल केली अाहे. गेल्या अनेक वर्षांपासून जयदेव हे ठाकरे यांचे निवासस्थान ‘माताेश्री’पासून वेगळे राहतात.