आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचे आमिष दाखवून भाजपच्या नगरसेवकाचा फेसबुक फ्रेंडवर बलात्कार, अश्लिल व्हिडिओही बनवला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नागपूर येथे भाजपच्या नगरसेवकाने पोलिसांना शिविगाळ केल्याचे प्रकरण ताजे असताना मुंबईत भाजपच्या एका नगरसेवकाने तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

कल्‍याण-डोंबिवली महानगरपालिकाचे भाजपचे नगरसेवक दया गायकवाड यांच्यावर एका 27 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. इतकेच नाही तर त्याने अश्लिल व्हिडिओ बनवून तिला वारंवार ब्लॅकमेल केल्याचेही पी‍डितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे पीडिता ही दया गायकवाड यांची फेसबुक फ्रेंड आहे. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन आरोपी दया गायकवाड यांच्या विरोधात काल (बुधवारी) गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार आहे.  
 
पीडितेने केले हे आरोप...
- पीडितेने पोलिसांना सांगितले की, नगरसेवक दया गायकवाड हे विवाहीत असून त्यांनी अनेकदा जबरदस्तीने बलात्कार केला.
- पीडिता आणि गायकवाडची भेट फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. चॅटिंग सुरु झाल्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिषही दाखवले होते.
- पीडितेने सांगितले की, गायकवाड याने तिला 7 जून रोजी टिटवाळा येथे एका लॉजवर नेले होते. तिने त्याने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. नंतर 16 जूनलाही एका रिसॉर्टमध्ये नेऊन तिथे दुसर्‍यांदा बलात्कार केला. इतकेच नाही तर त्याने अश्लिल व्हिडिओ बनवला.
- अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करेल, अशी धमकी देऊन त्याने वारंवार ब्लॅकमेलही केले.

एनसीपीच्या महिला विंगकडे केली तक्रार...
- आरोपी विवाहीत असून तो आपली फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विंगच्या प्रमुख अश्विनी धूमाळ यांच्याकडे तक्रार केली.
- त्यानंतर अखेर बुधवारी ठाणे येथील पोलिसांनी दया गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आरोपी फरार आहे.  

आरोपीने फेटाळला आरोप..
- दुसरीकडे, गायकवाड याने महिलेचे सर्व आरोप फेटाळले आहे.
- महिलेने त्याच्याकडे 10 लाख रुपयांची मागणी केली होती. ते न दिल्याने तिने बलात्काराचा आरोप केल्याचे गायकवाड याने म्हटले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक बलात्काराचा आरोप असलेल्या भाजपच्या नगरसेवकाचा फोटो...
बातम्या आणखी आहेत...