आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thane Building Collapse Issue Deputy Police Commissioner Perss Meet Today

'ठाण्‍यात बेकायदा इमारत उभारणीसाठी नगरसेवकासह अधिकार्‍यांनी घेतली होती लाच'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे /मुंबई- मुंब्रा येथील शिळफाट्याजवळील इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या 74 वर पोहचली आहे. रविवारी सकाळी आणखी दोन जखमी व्यक्तींचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 29 मुले, 25 पुरूष आणि 10 महिलांचा समावेश आहे.
दुर्घटनेप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी नऊ जणांना अटक केली असून न्यायालयाने सर्व आरोपींना 20 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

उल्लेखनिय म्हणजे बेकायदा इमारत उभारण्यासाठी नगरसेवकासह अधिकार्‍यांनी लाच घेतल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले असल्याचे ठाण्याचे पोलिस आयुक्त के.पी.रघुवंशी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या बांधकामाला परवानगी देण्यासाठी बिल्डरांनी संबंधित अधिकारी आणि नगरसेवक हीरा पाटील यांना लाच दिली होती. अवघ्या तीन महिन्यात ही अनाधिकृत इमारत उभारण्यात आली होती. याशिवाय पालिकेचे उपायुक्त उपायुक्त दीपक चव्हाण यांच्या घरी पाच लाख रुपये आणि संपत्तीचे दस्तावेज सापडल्याचेही रघुवंशी यांनी सांगितले.

अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक झालेल्यामध्ये बिल्डर जमिल कुरेशी आणि सलिम शेख, ठाणे मनपा उपाआयुक्त दीपक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हीरा पाटील, ठाणे मनपा कनिष्ठ अभियंते बाळासाहेब आंधळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस सय्यद, मनपा क्लार्क किसन मडके, बिल्डिंग मटेरियल सप्लायर अफरोज अन्सारी आणि इस्टेट एजंट जब्बार पटेल यांचा समावेश आहे.