आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉल सेंटर रॅकेटमुळेे अमेरिकी महिलेचा बळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे - ठाण्यातील कोट्यवधी डॉलरच्या कॉलसेंटर रॅकेटचे अनेक धक्कादायक किस्से आता उजेडात येत आहेत. अमेरिकी महसूल अधिकारी असल्याची बतावणी करून पैशांची मागणी केल्यानंतर ती पूर्ण करण्यास नकार देणाऱ्या एका वृद्ध अमेरिकी महिलेचा बळी घेतल्याचे स्पष्ट झाले .

या रॅकेटचा भंडाफोड करणारे ठाण्याचे पोलिस आयुक्त परमवीर सिंघ यांनी सांगितले की, तपासात कॉल रेकॉर्डची हार्ड डिस्क स्कॅन करताना अत्यंत महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. या कॉल सेंटरच्या कर्मचाऱ्याने धमकी दिल्यामुळे एका अज्ञात वयोवृद्ध अमेरिकी महिलेला धक्का बसला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. कॉल रेकॉर्डमध्ये हा प्रकार उघडकीस आला. एका कॉलमध्ये त्या महिलेचा मुलगा तिच्या मृत्यूला जबाबदार धरून कॉलरला शिव्या घालत आहे. तपास पथक त्या कॉलचे ठिकाण आणि कॉल करणाऱ्या कर्मचाऱ्याचा शोध घेत आहे. याप्रकरणी पोलिस आरोपीवर भादंविच्या अतिरिक्त ३०४ कलमान्वये गुन्हा नोंदवण्याचीही शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...