आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस नगरसेविकेच्या स्टंटबाज मुलाचा अपघाती मृत्यू, पाहा स्टंटबाजी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रणेश पाटील स्टंटबाजी करताना - Divya Marathi
प्रणेश पाटील स्टंटबाजी करताना
मुंबई- ठाण्यातील मुंब्रा परिसरातील काँग्रेसच्या नगरसेविका रेश्मा पाटील यांच्या मुलाचा नुकताच अपघाती मृत्यू झाला. पाटील यांचा मुलगा प्रणेश (20) याचा रविवारी कंटेनरखाली येऊन मृत्यू झाला आहे. स्टंटबाजी करतानाच प्रणेश कंटेनरखाली चिरडून ठार झाल्याचे बोलले जात आहे.
याबाबतची माहिती अशी की, रेश्मा पाटील यांचा मुलगा असलेला प्रणेश पाटील याला महागड्या स्पोर्टस बाईकचा छंद होता. प्रणेशकडे सध्या चार महागड्या बाईक होत्या. या बाईक तो भरधाव चालवायचा. महागड्या गाड्यावर स्टंटबाजी करताना अनेकांनी त्याला यापूर्वी पाहिले होते. तसेच स्टंटबाजी करतानाचे अनेक फोटो त्याने सोशल मिडियात टाकत असे.
रविवारी रात्री प्रणेश पाटील आपल्या गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी मुंब्रा येथून माजिवाड्यात चालला होता. त्याच्यासमवेत त्याचा मित्र झिबेर शरीफ हाही होता. पेट्रोल भरून रात्री साडेआकराच्या सुमारास तो रेतीबंदर परिसरात तो कंटेनरखाली आला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्रणेश केवळ 20 वर्षाचा होता.
दरम्यान, पोलिसांनी कंटेनर चालक भगवान जगदाळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्याविरोधात कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाकल झाला आहे. कंटेनरचालकाने प्रणेश भरधाव गाडी चालवत होता व स्टंटबाजी करीत होता असा जबाब दिला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
पुढे पाहा, प्रणेशच्या स्टंटबाजीची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...