आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देहविक्रय करण्यास नकार; ठाण्यात युवतीवर अत्याचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे - देहविक्रयाचा व्यवसाय करण्यास नकार देणार्‍या 24 वर्षीय तरुणीचे स्तन कापल्याची क्रूर घटना गुरुवारी ठाण्यात घडली. मुलींना वेश्या व्यवसायात ढकलणार्‍या महिलेसह तिघांनी हे क्रौर्य केले.

या तरुणीला गुजरातमधून मानवी तस्करीद्वारे ठाण्यात आणण्यात आले होते. याठिकाणी वेश्याव्यवसाय चालवणार्‍या महिलेला तिला विकण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक राजन सास्ते यांनी सांगितले. या तरुणीने महिलेला देहविक्रय करण्यास नकार दिला. त्या वेळी या महिलेने तरुणीच्या शरीराचा हा भाग कापला. तसेच तिला मोठय़ा प्रमाणावर मारहाण करून तिचे दातही पाडले होते, असेही पोलिसांनी सांगितले. काही लोकांनी सुटका करून तिला रुग्णालयात दाखल केले. तरुणी बोलण्याच्या स्थितीत नसल्याचे पोलिस म्हणाले.
वेश्याव्यवसाय चालवणार्‍या रुबी या महिलेला शनिवारी अटक करण्यात आली असून तिचे दोन साथीदार आलम आणि अफराज फरार आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तिघांच्या विरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. रुबीला स्थानिक दंडाधिकार्‍यांसमोर हजर केले असता, 25 मार्चपर्यंत तिला पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

शरीरसंबंधास नकार देण्यार्‍या महिलेस जाळले
ठाण्यातील दुसर्‍या एका घटनेत लखन यादव या काँट्रॅक्टरने सहकार्‍याच्या पत्नीला शरीरसंबंधास नकार देण्याच्या कारणावरून रॉकेल टाकून जाळले. लखन यादव हा शुक्रवारी त्याच्या एका सहकार्‍याच्या घरी गेला होता. त्या वेळी त्याची पत्नी घरी एकटी होती. ही संधी साधून त्याने महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला; पण महिलेने त्याला नकार दिला. त्यामुळे लखनने तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. या महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लखनला अटक करण्यात आली असून त्याच्यावर 302 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.