आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्यात आघाडीचा 70-60 फॉर्म्युला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस 70 तर काँग्रेस 60 जागा लढवणार असल्याचे निश्चित झाल्याचे दोन्ही पक्षांकडून बुधवारी सांगण्यात आले असून समन्वय समितीच्या बैठकीनंतरच या जागावाटप फॉर्म्युल्याची अधिकृत घोषणा करण्यात येईल. ठाण्यासाठी राष्ट्रवादी 70 तर काँग्रेस 60 जागा असा तोडगा काढण्यात आला आहे. त्याची अंतिम घोषणा लवकरच करण्यात येईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.
ठाकरे यांनी आपल्याला फोन करून हा फॉर्म्युला सांगितल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी सांगितले. दोन्ही पक्षांच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये याबाबत चर्चा करून नंरतच अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल. ठाण्यामध्ये समविचारी पक्षांनी एकत्र यावे म्हणून काँग्रेस सोबत आघाडीची निर्णय घेण्यात आला होता, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीकडून राज्य उत्पादन शुल्कमंत्री गणेश नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार संजीव नाईक तर काँग्रेसकडून कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी आमदार मुझफ्फर हुसैन आदींनी चर्चा केली.