आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\' iPhone x\' खरेदीसाठी बँडबाजा घेऊन घोड्यावर पोहचला हा व्यक्ती, हे होते कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\' iPhone x\' खरेदीसाठी बँडबाजा घेऊन घोड्यावर पोहचलेला महेश.... - Divya Marathi
\' iPhone x\' खरेदीसाठी बँडबाजा घेऊन घोड्यावर पोहचलेला महेश....
मुंबई- अॅपलचा सर्वात महागडा फोन 'आयफोन X' ची शुक्रवारी भारतात विक्री सुरु झाली. तो मिळविल्याच्या आनंदात ठाण्यातील एक व्यक्तीने चक्क घोड्यावर बसून बॅंडबाजासह अॅपलच्या स्टोरमध्ये पोहचला. बॅंडबाजासोबतच त्याच्या वरातीत सामील झालेल्या लोकांनी 'I Love iPhone X' चे बॅनर झळकत होते. स्वत:ला मानतो अॅपला सर्वात मोठा फॅन....
 
- आयफोन विकणा-या रिटेलरने सांगितले की, ''मागील महिन्यापासून हा यूजर 'आयफोन X' खरेदी करण्यासाठी आमच्याकडून माहिती घेत होता. आज आम्ही आमच्या स्टोरमधील पहिला 'आयफोन X' त्याच्या हस्ते विकला.''
- घोड्यावर आलेल्या या व्यक्तीचे नाव महेश आहे. महेशने सांगितले की, तो आयफोनचा मोठा फॅन आहे आणि जेव्हा केव्हा आयफोनचे नवे मॉडेल लाँच होते तेव्हा सर्वात आधी खरेदी करायला मी जातो.
- 20 वर्षाचा महेश नेहमी आपल्या वडिलांच्या पैशाने आयफोन खरेदी करतो. मात्र, यावेळी आपल्या कमाईतून आयफोन एक्स खरेदी केला.
- सुरुवातीला तर लोकांना ही लग्नाचीच वरात वाटली. पण जेव्हा लोकांच्या हातात व महेशच्या हातात 'I Love iPhone X' चे बॅनर दिसला ते हे प्रकरण लक्षात आले. पण तरीही लोकांना आश्चर्य वाटत होते.
- भारतात या 'आयफोन X' ची किंमत 89,000 रुपये आणि 102000 रुपये ठेवली गेली आहे. या फोनला 64 जीबी आणि 256 जीबी व्हॅरिएंटसह लाँच केले आहे.
पॉकेट मनी सांभाळून जमा केले पैसे-
- महेशचे वडिल एक बिजनेसमॅन आहेत. तो शिक्षणासह पार्ट टाईम जॉब करतो. या फोनसाठी महेशने आपला पॉकेट मनी आणि सॅलरीतील पैसे बचत करून ठेवले होते.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, आयफोन खरेदीसाठी पोहचलेल्या महेशचे फोटोज आणि व्हिडिओ....
बातम्या आणखी आहेत...