आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका रात्रीत झाल्‍या 14 जणांच्‍या हत्‍या, आता येथील मुलांशी लग्‍न करायलाही घाबरतात मुली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ठाण्‍याजवळील कासारवडवली येथील थरकाप उडवणा-या हत्‍याकांडानंतर येथे जाण्‍यासही बाहेरील लोक प्रचंड घाबरतात. कित्‍येक लोकांनी या भागात जुळलेले लग्‍न तोडले आहे. लग्‍नानंतर या गावात जाण्‍यास नववधूंनी नकार दिला आहे. जाणून घ्‍या कशी आहे येथील परिस्‍थिती..

- कासारवडवली गावातील हसनेन वरेकर याने 27 फेब्रुवारीला कुटुंबातील 14 जणांची हत्‍या केली.
- कुटुंबीयांच्‍या हत्‍येनंतर मारेकरी हसनेने वरेकर याने आत्‍महत्‍या केली.
- मृतांमध्‍ये हसनेनशिवाय 7 मुले आणि 6 महिलांचा समावेश होता.
- कुटुंबीयांची हत्‍या करण्‍याआधी त्‍याने सरबतात गुंगीचे औषध मिसळले होते.
- हसनेन त्‍याच्‍या गतीमंदी बहिणीचे लैंगिक शोषण करत होता, अशी माहिती समोर आली.
आता कशी आहे परिस्‍थिती
- कासारवडवली परिसरात बाहेरील लोक जाण्‍यास घाबरतात. लोकांमध्‍ये अजूनही दहशत आहे.
- एका इंग्रजी वृत्‍तपत्राच्‍या माहितीनुसार कित्‍येक लोक या गावातील मुलांसोबत आपल्‍या मुलींचे लग्‍न लावणार होते. मात्र या हत्‍याकांडानंतर कित्‍येकांनी लग्‍नास नकार दिला.
- या गावात राहणारे शैबाज शेख यांनी सांगितले, 'माझे लग्‍न जुळणार होते. मात्र आता तुटले आहे. कारण माझे घर हसनेनच्‍या घरापासून 100 मिटर अंतरावर आहे. या हत्याकांडानंतर मुलींकडचे लोक लग्‍न जोडण्‍यास मनाई करतात. '
- नाव जाहीर न करण्‍याच्‍या अटीवर एकाने सांगितले की, मी हसनेनच्‍या घराजवळच राहतो. या हत्‍याकांडाच्‍या एका दिवसापूर्वी माझे लग्‍न झाले. मात्र नववधूने या घटनेनंतर घरी येण्‍यास नकार दिला.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, हत्‍याकांडाचे फोटो..
बातम्या आणखी आहेत...