आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाणे महापालिकेच्या शाळेच्या वर्गाच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले, शिक्षक किरकोळ जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे- ठाणे महापालिकेच्या कळवा येथील आनंद नगर येथील शाळा क्रमांक 27 च्या स्लॅबचे प्लास्टर आज सकाळी (शुक्रवारी) अकराच्या सुमारास कोसळले आहे. या घटनेत एक शिक्षक किरकोळ जखमी झाला आहे. विशेष म्हणजे त्यावेळी सातवी इयत्तेची विज्ञान विषयाची प्रयोग परीक्षा सुरु असताना ही घटना घडल्याने पुन्हा एकदा महापालिका शाळांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
 
कळवा पूर्व विटावा येथील आनंद नगर परिसरात ठाणे महापालिकेच्या 27 क्रमांकाच्या शाळेची तीन मजली इमारत आहे. या इमरतीच्या तिसऱ्या मजल्यावर शुक्रवारी सकाळी इयत्ता सातवीच्या वर्गाची प्रयोग परीक्षा सुरु होती. यावेळी वर्गात पर्यवेक्षक विकास चव्हाण (36) आणि काही विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी साधारण अकराच्या सुमारास या वर्गाच्या स्लॅबचे प्लास्टर अचानक विकास चव्हाण यांच्या अंगावर पडले. या घटनेत विकास चव्हाण हे किरकोळ जखमी झाले असून या घटनेने विद्यार्थ्यांमध्ये मात्र एकच गोंधळ उडाला होता. त्यानंतर ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान या घटनेने ठाणे महापालिका शाळांच्या इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. आजमितीला महापालिकेच्या अनेक शाळांची स्थिती धोकादायक असून भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न आता विचारला जात आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...