आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपीच्या मोबाइलमध्ये शेकडो क्लिप, 5 वीच्‍या मुलींसोबत घृणास्पद प्रकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी विकास चव्हाणला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. - Divya Marathi
आरोपी विकास चव्हाणला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ठाणे - महाराष्ट्रात शालेय विद्यार्थीनींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाली आहे. औरंगाबादमध्ये दुसरीतील विद्यार्थीनीवर शाळेतील शिक्षकांसह रिक्षा चालकांनी केलेल्या बलात्काराच्या घटनेपाठोपाठ आता ठाण्यात पाचवीतील मुलींचे लैंगिक शोषण करतानाची क्लिप तयार केली जाण्याचा घृणास्पद प्रकार उघड झाला आहे.
ठाणे महापालिकेच्या शाळेतील खाजगी सुरक्षारक्षकाने पाचवीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. सुरक्षारक्षकाने दोन्ही मुलींना मोबाइलमधील अश्लील चित्रफित दाखवून हा घृणास्पद प्रकार केला.

अश्लील क्लिप दाखवून केला घृणास्पद प्रकार
- ठाणे पूर्वेकडील मनपा शाळा क्रमांक 16 मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
- सुरक्षारक्षक विकास चव्हाणने मधल्या सुट्टीत दोन विद्यार्थिनींना फूस लावून सुरक्षारक्षकांच्या केबिनमध्ये नेले.
- तिथे मोबाइलमधील अश्लील क्लिप दाखवून तशीच क्लिप बनवण्याचा घृणास्पद प्रकार केला.
- या प्रकाराने हादरलेल्या दोन्ही मुली त्यादिवशी गप्प राहिल्या. मात्र, पुन्हा दोन दिवसांनी या नराधमाने त्यांना स्वच्छतागृहात जाताना अडवले. या घटनेने संतप्त झालेल्या मुलींनी हिंमत करुन त्याला लोखंडी रॉडने चोप दिला आणि तेथून पळ काढला.

मुख्याध्यापिका-शिक्षिकांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
- मुली शाळेतून थेट घरी गेल्या. त्यांनी घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला.
- संतप्त पालकांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापिका आणि शिक्षिकांना जाब विचारला. मात्र त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नाही असे पाहून पालक पोलिस स्टेशनला गेले.
मोबाइलमध्ये शेकडो क्लिप
- कोपरी पोलीसात गुन्हा दाखल केल्यानंतर सुरक्षारक्षक चव्हाणला अटक झाली.
- त्याबरोबरच त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. या मोबाईलमध्ये शंभरहून अधिक अश्लील क्लिप आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली.
- 35 वर्षीय सुरक्षारक्षक विकास चव्हाणच्या अटकेसोबतच पालिका प्रशासनाने शाळेच्या मुख्याध्यापिकेसह अन्य 4 शिक्षिकांना निलंबित केले आहे.
पुढील स्लाइडमध्ये, भंडाऱ्यात नराधमाचा दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, एकीचा विनयभंग
बातम्या आणखी आहेत...