आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Court Stayed The Decision To Leave The Water Into Jayakwadi Dam

जायकवाडी धरणात पाणी सोडण्‍याच्‍या निर्णयाला हायकोर्टाची ताप्तुरती स्थगिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरणांमधील पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणात सोडण्यावरून चांगलेच राजकारण पेटले असताना धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टाने मंगळवारी तात्‍पुरली स्‍थगिती दिली आहे. या स्थगितीमुळे नाशिक व नगर जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मात्र, मराठवाड्यातील पाणीप्रश्न आणखीही चिघळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी दोन दिवसांपूर्वी जायकवाडी धरणात अहमदनगर आणि नाशिक येथील चार धरणांमधून 12.84 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देण्‍यात आले होते. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने हे आदेश दिले होते. पाटबंधारे विभाग आणि औरंगाबाद जिल्हाधिकारी यांच्‍यातील सयुक्‍त बैठकीनंतर हा निर्णय घेण्‍यात आला होता. या निर्णयाला नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील जनतेने विरोध दर्शवला होता. सर्वपक्षीय नेत्यांनी याविरोधात आंदोलन केले. नाशिक व नगरमधील काही साखर कारखानदारांनी या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मंगळवारी हायकोर्टाने पाणी सोडण्यास 26 ऑक्टोबरपर्यंत तात्पुरती स्थगिती दिली. त्‍यामुळे मराठवाड्यातील पाणीप्रश्‍न आणखी पेटण्‍याची शक्‍यता आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 23 ऑक्टोबरला होणार आहे.