आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई -गोवा महामार्ग रुंदीकरणासाठी खा. हुसेन दलवाई यांचा रास्‍ता रोको

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिपळूण - मुंबई-गोवा महामार्गाचे रुंदीकरण व दुरुस्ती गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करा, या मागणीसाठी खा. हुसेन दलवाई यांनी सकाळी दहा वाजता चिपळूण येथील बहादूर शेख नाक्यावर रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे दोन तास चाललेल्‍या या आंदोलनाला एक हजार कार्यकर्त्यांची उपस्‍थिती होती.

युती सरकारच्या निषेधात निदर्शने देत त्‍यांनी रस्त्याची दुरुस्ती त्वरित करावी अशी मागणी केली आहे. कार्यकर्त्यांनी बहादूर शेख नाक्यावरील मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक रोखून ठेवली होती. शेवटी सौम्‍य लाठीमार करून पोलिसांनी आंदोलकांना पांगविले. या वेळी पोलिसांनी खा. हुसेन दलवाई समवेत १०० कार्यकर्त्‍यांना अटक केली व नंतर सोडून दिले .
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो..