आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • The Demolition Of Illegal Flats In Campa Cola Compound Beginning Today Will Be Filmed

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालिकेचे अधिकारी पुन्हा कॅम्पाकोलात, रहिवाशांची मात्र संघर्ष करण्याची तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वरळीतील कॅम्पाकोला सोसायटीतील 102 अनधिकृत फ्लॅटच्या पाडापाडीस रहिवाशांनी विरोध केल्याने पालिकेचा फौजफाटा माघारी फिरला. वरिष्ठांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेऊ असे पालिका अधिका-यांनी सांगितले. मात्र कारवाई थांबणार नाही व ती सुरूच राहील असे सांगितले होते. मात्र, पालिका अधिकारी पुन्हा एकदा कॅम्पाकोलात दाखल झाले आहेत. परतू आज ते बळाचा वापर न करता रहिवाशांना वास्तव्याची जाणीव करून देणार आहेत. तसेच त्यांची समजूत घालणार आहेत.
मुंबई पालिकेने त्यासाठी प्रशासकीय यत्रंणा सज्ज ठेवली होती. पोलिसांसह बुलडोझर व त्यासाठी लागणारे कर्मचारी यांची टीम सज्ज झाली होती. मात्र, कॅम्पाकोलावासिय घर न सोडण्यावर अजूनही ठाम राहिले त्यामुळे अधिका-यांनी काही तासांकरिता कारवाई स्थगित केली. दरम्यान, आज होणारी संभाव्य कारवाई टळावी म्हणून रहिवाशांनी आपापल्या घरात होम हवन करून घेतले. त्यामुळे पालिका पहिला घाव घालणार का आणि कधी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेचे कर्मचारी कॅम्पाकोला सोसायटीचे केवळ वीज, गॅस आणि पाणी आदीचे कनेक्शन सध्या तोडण्याच्या तयारीत आहेत. पालिकेचे मर्यादित कर्मचारीच ही कारवाई करणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आताही कॅम्पाकोला परिसरात पोलिसांचा जबरदस्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वीज, गॅस आणि पाण्याचे कनेक्शन कापतानाच सोसायटीच्या आवारात बांधण्यात आलेल्या तंबूची वीज कापण्यात येणार आहे. त्यानंतरच खरी कारवाई सुरु होणार आहे.
सोसायटीतील एका ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाल्याने तीन दिवसापूर्वी होणारी कारवाई पालिकेने तीन दिवस पुढे ढकलली होती. केवळ मानवतेच्या दृष्टीकोणातून ही कारवाई पुढे ढकलण्यात आली होती. कॅम्पाकोला सोसायटीत राहणारे विनोद कोठारी यांचे रविवारी निधन झाले होते. त्यामुळे कोठारी यांच्या पार्थिवावर 17 जून रोजी अंतिम संस्कार करण्यात आले. तसेच 18 जून रोजी कोठारी यांची शोकसभा झाली. त्यामुळे कॅम्पाकोला सोसायटीवर होणारी कारवाई 20 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. अखेर आजचा दिवस उघडला व सर्वांनाच नको असलेली कारवाई करणे भाग पडत आहे.
कॅम्पाकोलावरील कारवाईचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे कारवाईमध्ये अडथळा निर्माण करणार्‍यांचे चित्रीकरण करून त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर करताना न्यायालयाचा अवमान झाल्याचे निदर्शनास आणून देणार असल्याचे महापालिका अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी सांगितले.
पुढे पाहा, आज काय घडले कॅम्पाकोला सोसायटीच्या गेटवर....