आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Distress Calls From Mukesh Ambani\'s Plane That Shook ATC Mayday! Mayday!

मुकेश अंबानींचे विमान आग लागून समुद्रात कोसळल्याच्या मेसेजने उडाली धांदल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः मुंबई एयरपोर्टच्या हॅंगरवर उभे असलेले उद्योगपती मुकेश अंबानी यांचे जेट)

मुंबई- जगविख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विमानाला आग लागून ते समुद्रात कोसळल्याच्या मेसेजने चांगलीच धांदल उडाली.परंतु मुकेश अंबानींचे खासगी विमान 'एअरबस 319' हे मुंबई एयरपोर्टच्या हॅंगरवर उभेअसल्याची खात्री पटल्यानंतर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.

मुकेश अंबानी यांचे खासगी विमान 'एअरबस 319'मधून मुंबई एअर ट्रॅफिक कंट्रोल रूमला 'Mayday Mayday' असा धोक्याची घंटा देणारा मेसेज धडकला.त्यामुळे एकच धांदल उडाली. 'Mayday Mayday' असा मेसेज अंबानी यांच्या विमानातून एटीसीला मिळाला. विमानाची मोठी दुर्घटना होत असताना 'Mayday' हा मेसेज एटीसीला मदत मागण्यासाठी पाठवला जातो.

Mayday याचा अर्थ मराठीत 'वाचवा' असा मानला जातो. मुंबई एटीसीला हा मेसेज मिळाला तेव्हा संबंधित विमान हॅंगरवर उभे होते. मुकेश अंबानी यांनी 2007 मध्ये 'एअरबस 319' हे जेट विमान त्यांची पत्नी नीता अंबानी यांना बर्थडे गिफ्ट दिले होते.

'मुंबई मिरर'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सोमवारी (10 नोव्हेंबर) रात्री 8 वाजून 32 मिनिटांना मुंबई एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या मुख्य टॉवरला Mayday Mayday असा अलर्ट मिळाला होता. एटीसीच्या अधि‍कारी काही करण्याच्या आता पुन्हा 8 वाजून 38 मिनिटानी पुन्हा अलर्ट मिळाला. 'दिल्ली-लाहोर-मस्कट' मार्गावरील एखाद्या विमानातून हा अलर्ट मिळाल्याचा अंदाज एटीसीच्या अधिकार्‍यांनी लावला होते. मात्र, उड्डान घेतलेल्या कोणत्याच विमानातून हा अलर्ट न मिळाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.

पहिला अलर्ट
विमानाच्या इंजिनाला आग लागली असून ते कोसळत आहे. दिल्लीहून लाहोरमार्गे हे विमान मस्कट जात आहे.

दुसरा अलर्ट
विमानाच्या इंजिनला आग लागली असून ते समुद्रात कोसळत आहे.

एक सीनियर एटीसी अधिकारीने सांगितले की, दिल्ली आणि मस्कट मार्गावरील विमानातून अलर्ट न मिळाल्याची माहिती मिळाल्यानंतर एटीसीने रेडियो फ्रीक्वेंसीच्या मदतीने अलर्ट पाठवणार्‍या विमानाचा शोध घेण्यात आला. यासाठी पाच पथके पाठवण्यात आली. सगळ्या विमानांचे निरिक्षण केल्यानंतर मिळालेली माहिती एटीसीच्या अधिकार्‍यांना थक्क करणारी होती. ती म्हणजे, Mayday चा मेसेज उद्योगपती मुकेश अंबानी यांचे खासजी विमान एअरबस 319 मधून आला. 2007 मध्ये हे विमान मुकेश अंबनी यांनी पत्नी नीता अंबानी यांना वाढदिवशी भेट दिले होते. अंबानींचे खासगी एअरबस हँगरमध्ये उभे होते. मात्र, यावेळी विमानात कोणीच नव्हते.

रिलायन्सने दिले स्पष्टीकरण
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीचे एका प्रवक्त्याने याघटनेबाबत स्पष्टीकरण दिले आहे. विमानाची इमरजेंसी सिस्टमची टेस्ट घेतली जात होती. याबाबत संबंधित अधिकार्‍यांना सूचना देण्यात आली होती. आता या प्रकरणाची डीजीसीए चौकशी करत आहे. चौकशीचा अहवाल पुढील आठवडण्यात येण्याची शक्यता आहे.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, मुकेश अंबानी यांचे खासगी विमान 'एअरबस 319'