आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Duke And The Duchess Had Dinner With Bollywood Celebs

विल्यम-केटच्या रॉयल डिनरमध्ये अवतरले बॉलीवूड, मेन्यूमध्ये विदेशी डिश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरूख आणि ऐश्वर्याशी चर्चा करताना केट मिडलटन. - Divya Marathi
शाहरूख आणि ऐश्वर्याशी चर्चा करताना केट मिडलटन.
प्रिन्स विल्ययम आणि केट मिडलटन हे रविवारी प्रथमच मुंबईत आले. भारत आणि भूटानच्या 7 दिवसांच्या दौऱ्यावर निघालेल्या या रॉयल कपलने पहिला दिवस मुंबईत घालवला. येथे त्यांनी 26/11 च्या हल्ल्यात ठार करण्यात आलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण केली. ओव्हल ग्राऊंडवर सचिन तेंडुलकर आणि इतर मुलांबरोबर क्रिकेट खेळले. त्यानंतर सायंकाळी शाही डिनरमध्ये बॉलीवूड सेलिब्रिटींसह अनेक बड्या हस्ती सहभागी झाल्या. शाहरुख खान, शिल्पा शेट्टी, आरबीआयचे गव्हर्नरही उपस्थित होते. डिनरमध्ये बहुतांश विदेशी डिश होत्या.

शाहरूखसह सेलिब्रिटींची मांदियाळी
- शाहरुखशिवाय करण जौहर, अर्जुन कपूर, आलिया भट्ट, जॅकलिन फर्नांडिस, फरहान अख्तर, आदिती राव हैदरी, परिणिती चोप्रा आणि सोनम कपूर यांची उपस्थिती होती.
- शिल्पा शेट्टी नेही पार्टीत जाण्यापूर्वी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली. तसेच लेखिका शोभा डे यांचीही उपस्थिती होती.
- सचिन तेंडुलकर पत्नीसह पोहोचला होता. तर आरबीआयचे गव्हर्नरही पत्नीसह आलेले होते.
- कार्यक्रमात बोलताना प्रिन्स विल्यम यांनी केरळच्या आगीत मृत पावलेल्यांबाबत दुःख व्यक्त केले.
- प्रिन्स विल्यमने बोलण्याची सुरुवात नमस्तेने केली तर शेवट धन्यवादने.
असा होता मेन्यू..
- रॉयल कपलसाठी शाही डीश तयार करण्यात आल्या होत्या.
- शाही कोरमापासून ते शरीफा कुल्फीपर्यंत सर्व काही होते.
- दाल लंगरवली, पनीर शाही कोरमा, मिंट रायता, दही, पापड, लखनऊ व्हेज बिर्याणीही होती.
- नॉन व्हेजमध्ये आजवानी मासे होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा. PHOTOS