आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोकियो Safe तर कराची Unsafe; जगातील सुरक्षित शहरांच्या यादीत दिल्ली, मुंबईही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/लंडन- जपानची राजधानी टोकियो हे जगातील सर्वात सुरक्षित तर पाकिस्तानची राजधानी कराची हे असुरक्षित शहर आहे. ‘द इकोनॉमिस्ट इंटेलिजेंस यूनिट’ने 'सेफ सिटी इंडेक्स-2017' जाहीर केली आहे. इंडेक्समध्ये सिंगापूर दुसर्‍या तर जपानमधील ओसाका तिसर्‍या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे यादीत दिल्ली (43 व्या क्रमांकावर) तर मुंबईचा (45 व्या क्रमांकावर) समावेश करण्यात आला आहे.

इंडेक्समध्ये 60 शहरांचा समावेश करण्यात आला आहे. टॉप-10 शहरांमध्ये अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्समधील एकाही शहराचा समावेश करण्‍यात आलेला नाही.

सर्वात सुरक्षित 10 शहरांमध्ये आशियातील 4
- सर्वात  सुरक्षित 10 शहरांमध्ये आशिया आणि यूरोपचा दबदबा कायम आहे.
- टॉप-10 मध्ये 4 पूर्वोत्तर आशियातील आहेत. यूरोपीय शहर एम्सटर्डम, स्टॉकहोम आणि झुरिचचा समावेश आहे.

सुरक्षित टॉप-10 शहर...
1. टोकियो - जपान (89.8)
2. सिंगापूर- सिंगापूर (89.64)
3. ओसाका- जपान (88.87)
4. टोरंटो- कॅनडा- (87.36)
5. मेलबर्न- ऑस्ट्रेलिया  (87.3)
6. एमस्टर्डम- नेदरलंड (87.26)
7. सिडने- ऑस्ट्रेलिया    (86.74)
8. स्टॉकहोम- स्वीडन- (86.72)
9. हाँगकाँग - हाँगकाँग  (86.22)
10. झुरिच- स्वित्झर्लंड (85.2)
 
असुरक्षित टॉप-10 शहरे...
60. कराची- पाकिस्तान (38.77)
59. यंगून- म्यांमार (46.47)
58. ढाका-  बांगलादेश (47.37)
57. जकार्ता-  इंडोनेशिया  (53.39)
56. हो ची मिन्ह सिटी -व्हियतनाम (54.34)
55.  मनीला - फिलीपीन्स  (54.86)
54.  काराकस - व्हेनेजुएला  (55.22)
53.  क्योटो - जपान  (56.39)
52.  तेहरान - इराण (56.49)
51.  काहिरा - मिस्र  (58.33)

शेजारील राष्ट्रांमध्ये चीन अव्वल...
- भारत आणि चीनमध्ये सुरक्षिततेबाबत तुलना केल्यास त्यात चीन अव्वल आहे. चीनमधील दोन शहरांचा समावेश टॉप-35 मध्ये आहे. भारतातील दिल्ली आणि मुंबई अनुक्रमे 43 व्या आणि 45 व्या क्रमांकावर आहेत.

49 निकषांवर ठरवण्यात आली शहरांची क्रमवारी...
- सेफ सिटी इंडेक्ससाठी पर्सनल सिक्युरिटी, डिजिटल सिक्युरिटी, हेल्थ सिक्युरिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चरची सिक्युरिटी सारखे 49 निकष लावण्यात आले आहेत.
 
 
 
बातम्या आणखी आहेत...