आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांची हकालपट्टी करा : सचिन सावंत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : मंत्रिपदाचा गैरवापर करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर दबाव टाकणारे राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जानकर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी रविवारी केली.

जानकर यांनी गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील नगरपालिका निवडणूक अधिकाऱ्याला फोन करून काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द करावा म्हणून दबाव टाकला होता. जानकर यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करून निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाने जानकर यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करून त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
बातम्या आणखी आहेत...