आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या प्रथमेशची गगनभरारी; अंतराळ संस्थेमध्ये शास्त्रज्ञ बनणारा पहिला मराठी युवक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- झाेपडपट्टीतील दहा बाय दहाची खाेली अाणि घरातील परिस्थितीवर जिद्दीने मात करीत पवई येथील प्रथमेश हिरवे या २५ वर्षांच्या तरुणाने थेट इस्रोमध्ये पाऊल ठेवले अाहे. भारतीय अंतराळ संशाेधन संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून अवकाश भरारी घेणारा प्रथमेश हा मुंबईतील पहिला मराठी युवक ठरला अाहे. जानेवारीमध्ये ताे चंदिगड येथे इस्रोचा इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून रुजू हाेणार अाहे.  


मुंबईतल्या पवई येथील निटी गावातल्या तीन हजार लाेकवस्तीच्या गजबजलेल्या झाेपडपट्टीतील ही देदीप्यमान यशाची कहाणी. मुंबई महानगरपालिका शाळेत शिक्षक असलेले साेमा हिरवे यांचा प्रथमेश हा माेठा मुलगा, तर बारावी विज्ञान शाखेत शिकत असलेला निखिल हा धाकटा मुलगा. प्रथमेशला दहावीत ७७.५३ टक्के गुण मिळाल्याने वडिलांनी त्याची कलचाचणी करवून घेतली. त्या वेळी तज्ज्ञांनी त्याला कला शाखेकडे जाण्याचा सल्ला दिला. प्रथमेशने इंजिनिअर बनण्याचाच दृढनिश्चय केला होता. विलेपार्ले येथील भगुभाई मफतलाल पाॅलिटेक्निकमध्ये २००७ मध्ये त्याने इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला.   


दहावीपर्यंतचे शिक्षण मराठीतून झाल्यामुळे इंजिनिअरिंगचे इंग्रजी माध्यमातील शिक्षण त्याला जड जाऊ लागले. याबाबत प्रथमेश सांगतो, प्राध्यापकांनी इंग्रजी वाचनाची आवड लावून ही भीती घालवली. अभियांत्रिकीत ८४ टक्के मिळवून महाविद्यालयात इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीतून दुसरा अालाे. दरम्यान, एल अँड टी स्वीच गिअर अाणि टाटा पाॅवरमध्ये वर्षभर इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. एल अँड टीमधील अन्वेष दाससरांनी डिप्लाेमावर अवलंबून न राहता अाणखी शिकण्याचा सल्ला दिला. त्यानंतर नवी मुंबईच्या श्रीमती इंदिरा गांधी काॅलेज अाॅफ इंजिनिअरिंगमधून २०१४ मध्ये पदवी संपादन केली. पदवीत मुंबई विद्यापीठातून २५ वे रँकिंग अाले . हैदराबादच्या एसीई इंजिनिअरिंग अकॅडमी संस्थेत अभियांत्रिकीशी निगडित स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असतानाच प्रथमेशने अाॅक्टाेबर २०१५ मध्ये इस्रोमध्ये परीक्षा दिली हाेती. 

 

अधिकाऱ्याने दुसऱ्या मुलाखतीवेळीही ओळखले
गतवर्षी मार्चमध्ये मुलाखतीसाठी बाेलावले. या परीक्षेत संपूर्ण भारतातून दुसरा येऊनही केवळ एकच पद असल्याने त्याची निवड हाेऊ शकली नाही. मात्र, चिकाटी कायम ठेवत त्याने यंदा ७ मे राेजी पुन्हा परीक्षा दिली. ९ जागांसाठी अालेल्या १६ हजार अर्जातून प्रथमेशची निवड हाेऊन त्याला मुलाखतीसाठी बंगळुरू येथे बाेलावणे अाले. प्रथमेशला बघताच मुलाखतकार म्हणाले की, मी तुम्हाला कुठेतरी बघितले अाहे. त्या वेळी प्रथमेशने अाधीच्या मुलाखतीची अाठवण करून दिली. प्रथमेश म्हणताे की, हे वाक्य माझ्यासाठी खूप महत्त्वाचे हाेते. कारण त्या अधिकाऱ्यांनी एक वर्ष झाल्यानंतरही मला अाेळखले हाेते. १४ नाेव्हेंबरला त्याला देशातल्या या सगळ्यात माेठ्या अंतराळ क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेकडून नाेकरीचे अामंत्रण अाले.

बातम्या आणखी आहेत...