आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा समाजाच्या मागण्यांची मंत्रीनिहाय जबाबदारी निश्चित; उपसमितीची पहिली बैठक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मराठा क्रांती माेर्चाच्या मागण्या साेडविण्यासाठी नेमण्यात अालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक गुरुवारी झाली. यात समाजाच्या विविध मागण्या पूर्ण करण्याबाबत पाठपुरावा करण्यासाठी प्रत्येक मंत्र्याकडे वेगळी जबाबदारी या बैठकीत निश्चित करण्यात अाली. या सर्वच मागण्यांवर राज्य शासन गांभीर्याने कार्यवाही करत असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील यांच्यासह शिक्षणमंत्री विनोद तावडे, बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री सुभाष देशमुख व कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा या समितीत समावेश अाहे. 

चंद्रकांत पाटील :  मराठा आरक्षण, शिवाजी महाराजांचे स्मारक, मराठा कुणबी जात प्रमाणपत्र विषयांचा पाठपुराव्याची जबाबदारी.
विनाेद तावडे : मराठा आरक्षण व शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेबाबत पाठपुरावा.
एकनाथ शिंदे : मराठा समाजासाठी जिल्हानिहाय वसतीगृहासंदर्भात पाठपुरावा.
गिरीश महाजन : ‘सारथी’ संस्थेच्या कामकाजाची, ॲट्रॉसिटी कायद्याबाबत अभ्यास.
सुभाष देशमुख : अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष नेमणे, तरुण उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून देणे.
संभाजी पाटील निलंगेकर : कौशल्य विकास कार्यक्रमाद्वारे मराठा समाजातील तरुण तरुणींना प्रशिक्षण देणे. 
बातम्या आणखी आहेत...