आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या वर्षी वेब सिरीजमध्ये आले पाच मोठे प्लेअर; 4 हिट, रामगोपाल वर्मा फ्लॉप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - २०१७ हे वर्ष वेब सिरीजच्या क्षेत्रात मोठे ब्रँड आणि निर्माते येण्यासाठी गाजले. या वर्षी आतापर्यंत टीव्ही आणि चित्रपटांची पाच मोठी नावे आली आहेत. विक्रम भट्ट, एकता कपूर, फरहान अख्तर, जे. डी. मजिठिया आणि रामगोपाल वर्मा. त्यापैकी चार हिट राहिली, तर रामगोपाल वर्मा फ्लॉप आहेत.  

या क्षेत्रात मोठी नावे येण्याची सुरुवात दोन वर्षांपूर्वी यशराज फिल्म्सद्वारेच झाली होती. यशराजचे यूट्यूब चॅनल वाय फिल्म्सची वेब सिरीज-मेन्स वर्ल्ड आणि बेंड बाजा बारात २०१५ मध्ये सुरू झाले. दोन्हींनी आतापर्यंत अनुक्रमे ४० लाख आणि ६० लाख व्ह्यूचा आकडा पार केला आहे. २०१६ मध्येही लव्ह शॉट्स, लेडीज रूम यांसारख्या लोकप्रिय वेब सिरीज आल्या. त्यांनाही १० लाखांहून जास्त व्ह्यू मिळाले आहेत. वाय फिल्म्सचे उपाध्यक्ष (ब्रँड पार्टनरशिप्स अँड टॅलेंट मॅनेजमेंट) आशिष पाटील म्हणाले की, यू ट्यूबवर दर तासाला ३०० तासांचे कंटेंट येते.
 
त्याशिवाय आणखी २० प्लॅटफॉर्म आहेत, तेथेही कंटेंट येते. हे कंटेंट क्रिएटरसाठी चांगले आहे. दुसरीकडे, टेलिव्हिजन निर्माता यश पटनाईक यांनीही अलीकडेच यूट्यूब चॅनल बियाँड ओरिजिनल्सद्वारे ब्लॅक कॉफी ही नवी वेब सिरीज लाँच केली आहे. टीव्हीसाठी त्यांनी ‘एक वीरा की अरदास’ आणि ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिका तयार केल्या आहेत. ते म्हणाले की, आम्ही स्टोरी टेलर्स आहोत. आम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी एका मंचाची गरज आहे.
 
२०२० पर्यंत स्मार्टफोन ६५ कोटी लोकांजवळ असेल. डिजिटल जगात प्रेक्षकवर्ग मोठा आहे.  
देशात वेब सिरीज लोकप्रिय करण्याची सुरुवात २०१२ मध्ये आयआयटी खरगपूरचे पदवीधर अरुणाभकुमार यांनी केली होती. त्यांनी ऑनलाइन डिजिटल चॅनल सुरू केले होते-द व्हायरल फीव्हर म्हणजे टीव्हीएफ. त्यांच्या पहिल्या व्हिडिओला कमी व्ह्यू मिळाले, पण दुसरा व्हिडिओ रोडीज हिट झाला आणि पाच दिवसांतच त्याला दहा लाखांपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले. नंतर २०१५ मध्ये अरुणाभ आणि टीव्हीएफने इतिहास घडवला. तेव्हा त्यांच्या पाच भागांच्या वेबसिरीज पिचर्सने आयएमडीबीचे १० पैकी ९.४ रेटिंग मिळवले. त्याने आयएमडीबीच्या २५० टॉप सिरीजमध्ये स्थान मिळवले. ही त्या श्रेणीत सामील एकमेव भारतीय एंट्री आहे. पिचर्सच्या पहिल्या भागाला ४६ लाखांपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले होते. आता हा आकडा ६० लाखांवर गेला आहे. ती अजूनही देशाची सर्वात लोकप्रिय वेब सिरीज ठरली आहे. त्यानंतर टीव्हीएफच्या परमनंट रूममेट्स आणि ट्रिपलिंग या दोन वेबस सिरीज. दोन्हींनाही ६० लाखांपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत. टीव्हीएफच्या ग्राहकांची संख्या आज २९ लाखांपेक्षा जास्त आहे. मात्र, या वर्षीच्या सुरुवातीला अरुणाभवर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर टीव्हीएफच्या ब्रँड व्हॅल्यूवर उलट परिणाम झाला.
  
अल्ट्री मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे क्रिएटिव्ह हेड रजत अग्रवाल म्हणाले की, वेबवर विनोदाला चांगले प्रेक्षक मिळत आहेत. आतापर्यंत असे दिसले की, टीव्हीएफ आणि फिल्टर कॉपीसारख्या लहान प्लेअर्सनी वेब सिरीजमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पण अखेर मोठे प्लेअर्सच राहतील. अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटही तीन नव्या वेबसिरीजवर काम करत आहे. त्यापैकी एक आहे-अर्बन लीजेंड, ती कॉमेडीवर आधारित फिक्शन वेबसिरीज आहे.  
वेबसिरीजमध्ये अपयशी होणारे एक मोठे नाव म्हणजे रामगोपाल वर्मा. इंडियन विकी मीडियाचे सिद्धार्थ लाइक म्हणाले की, इनोव्हेटिव्ह कंटेंट आणण्याची अपेक्षा रामगोपाल वर्मांकडून असते, पण खेदाची बाब म्हणजे त्यांनी आपल्या गन्स अँड थाइज या वेबसिरीजमध्ये नग्नता आणि अपमानजनक भाषेचा वापर केला. त्यामुळे ते फ्लाॅपही ठरले.  

इतर हिटमध्ये यांचा समावेश
  द व्हायरल फीव्हर म्हणजे टीव्हीएफ- वेबसिरीज पिचर्स २०१५ मध्ये सुरू केली. तिला आयएमडीबीच्या १० पैकी ९.४ रेटिंग मिळाले. ही देशाची सर्वात लोकप्रिय वेब सिरीज आहे. त्यानंतर टीव्हीएफच्या आणखी दोन वेबसिरीज आल्या-परमनंट रूममेट्स आणि ट्रिंपलिंग. दोन्हींनाही ६० लाखांहून जास्त व्ह्यू मिळाले. टीव्हीएफच्या सबस्क्रायबर्सची संख्या आज २९ लाखांहून जास्त आहे.  
-  ए. आय. शा माय व्हर्च्युअल गर्लफ्रेंड. तिला आतापर्यंत १७,९४,७२० व्ह्यू मिळाले.  
-  द लेझी स्टुडिओची वेबसिरीज- लाइफ सही है
 
फरहानची सिरीज सुपरहिट
- विक्रम भट्ट- यू ट्यूब चॅनल- व्हीबी ऑन द वेब. सिरीज-माया-व्ह्यू ३८ लाख. ट्विस्टेड : व्ह्यू ४६ लाख.
 
सब्स्क्राइबर्स :  ४,९५,७३५.ते म्हणतात. वेब फ्यूचर आहे. लोक फोनवर एंगेज आहेत. त्यामुळे वेबसिरीजही फोनसाठी बनवली जाते.

- एकता कपूर- यू ट्यूब चॅनल- अल्ट बालाजी. सिरीज : रागिनी एमएमएस- व्ह्यू २२.८३ लाख.
सब्स्क्राइबर्स : ४,३२,२४७. त्या म्हणतात. चित्रपट समूहासाठी ,टीव्ही कुटुंबासाठी आणि वेबसिरीज एकट्या प्रेक्षकासाठी आहे.
 
- जे. डी. मजिठिया - वेब सिरीज साराभाई व्हर्सेस साराभाई टेक टू बनवली. हॉट स्टारवर प्रदर्शित झाली. तिला १० लाख व्ह्यू मिळाले. मजिठिया म्हणाले की, वेब सिरीजचा एक फायदा हा आहे की तुम्ही कमी भागांसह ती येथे टेलिकास्ट करू शकता.

- रामगोपाल वर्मा- वेब सिरीज गन्स अँड थाइज बनवण्याचे सांगितले. पण त्याचे फक्त ट्रेलरच आले. त्याला ६२ लाख व्ह्यू मिळाले. पण त्यात अश्लील भाषा आणि नग्नता होती. ती आवडली नाही. वर्मा म्हणाले की, पूर्ण वेब सिरीज जानेवारीत येईल.
 
- फरहान अख्तरचे प्रॉडक्शन हाउस एक्सेल एंटरटेनमेंटने अॅमेझॉन प्राइमसोबत ‘इनसाइड एज’ वेब सिरीज बनवली. ती भारतात अॅमेझॉन प्राइमवर सर्वात जास्त पाहिली गेलेली सिरीज आहे.
बातम्या आणखी आहेत...