आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारने शेतकऱ्यांना फसवले : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील डाळीच्या व्यवस्थापनात राज्य सरकार संपूर्णपणे अपयशी ठरले अाहे. राज्यातील शेतकऱ्यांची तसेच ग्राहकांची घोर फसवणूक सरकारने केल्याचे स्पष्ट झाले असून हे सरकार फसवे असल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मंगळवारी केली.   

एकीकडे राज्यातील शेतकऱ्यांना डाळीचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने तुरीचे उत्पादन वाढल्यावर हमी भावाने तूर खरेदी करणे अपेक्षित होते.

पण सरकारच्या आशीर्वादाने व्यापाऱ्यांनी तुरीचे भाव पाडले आणि सरकारनेही खरेदीसाठी हात आखडते घेतले आहेत. राज्यात बारदाना  आणि गोदामे उपलब्ध नाहीत, अशी तकलादू कारणे दिली जात आहेत. त्याचबरोबर आता पणनमंत्र्यांनी अगोदर खरेदी केलेल्या तुरीची मोजणी होत नाही तोपर्यंत नवीन खरेदी करू नये, असे तुघलकी फर्मान काढल्याने अगोदरच संथगतीने सुरू असलेली तूर खरेदी पूर्णपणे ठप्प झाल्याचे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...