आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगभरातील 80 भाषेत गाणे गाते ही 12 वर्षाची मुलगी, आता रचणार हा विश्वविक्रम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुचेता सतीश केवळ 12 वर्षाची आहे. - Divya Marathi
सुचेता सतीश केवळ 12 वर्षाची आहे.

मुंबई- आपल्या खास प्रकारच्या सिंगिंग टॅलेंटमुळे 12 वर्षाची एक मुलगी सध्या सोशल मीडियात झळकत आहे. ती हिंदी, मल्याळम, तामिळसह 80 भारतीय आणि विदेशी भाषांत गाणे गाऊ शकते. या छोट्या मुलीचा हा मोठा पराक्रम लवकरच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंदवला जाणार आहे. या मुलीचे गण्याच्या आणि आवाजाचे दिवाने लोक भारतातच नव्हे तर जगभरात आहेत. 29 डिसेंबरला होणार सुचेताचा हा खास कॉन्सर्ट...

 

- 12 वर्षाच्या या मुलीचे नाव आहे सुचेता सतीश. केरळमध्ये राहणारी सुचेता इयत्ता 7 वी शिकते. सध्या ती आपल्या आई-वडिलांसह दुबईत राहते. 
- सुचेता पूर्ण सुर आणि लयीत 80 भाषांक गाणे गाऊ शकते. यावर्षी 29 डिसेंबर रोजी होणा-या एका कन्सर्टमध्ये 85 भाषांत गाणे गाऊन सुचेता गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये एक अनोखा विक्रम करेल.
- सध्या एका कन्सर्टमध्ये सर्वात जास्त भाषांत गाणे गाण्याचा रिकॉर्ड के सी राजू श्रीनिवास याच्याकडे आहे. त्याने 76 भाषांतील गाणे गायली होती.

 

फक्त एका वर्षात शिकली ही कला-

 

- सुचेताच्या माहितीनुसार, तिने 80 भाषांतील ही गाणे फक्त एका वर्षात शिकली आहेत. रिकॉर्ड तोडण्यापूर्वी सुचेताच्या डोक्यात आहे की, आणखी पाच भाषांची गाणी गायला शिकायचे.  
- ती फक्त इंग्रजीत गाणी गात होती. यानंतर तिने जपानी भाषेत गाणे गायचा प्रयत्न केला आणि लोकांना ते पसंत पडले. येथूनच तिने वेगवेगळ्या भाषेतील गाणी शिकण्याचे ठरवले.
- जपानीशिवाय सुचेता फ्रान्सीसी, हंगेरियन आणि जर्मन भाषेतील गाणे सुद्धा शिकली आहे. 

 

यू ट्यूबवर लोकप्रिय आहे सुचेता-

 

- यू ट्यूब चॅनेलवर तिचे असे गाण्याचे व्हिडिओ आणि इंटरव्यू आहेत ज्यात सुचेता तमाम भाषांत गाणे गाताना दिसते. 
- तिचे इंटरव्यू अनेक विदेशी रेडियो आणि टीव्ही चॅनेल्सनी प्रकाशित केले आहेत. 

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सुचेताचे काही निवडक फोटोज ...

बातम्या आणखी आहेत...