आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • The Journalist Accused Of Gang Raping Power Mill Compound Mumbai Maharashtra Hindi News Online

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई गँगरेप: चौथ्‍या आरोपीला अटक, एक आरोपी अल्पवयीन असल्याचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/मुंबई - मुंबई गँगरेप प्रकरणातील चौथ्‍या आरोपीला रविवारी पहाटे पोलिसांनी अटक केली आहे. काल सायंकाळी तिस-या आरोपीला अटक करण्‍यात आली. आज पहाटे 4.15 वाजताच्‍या सुमारास पोलिसांनी चौथ्‍या आरोपीला पकडले. पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दरम्‍यान, एक आरोपी अल्पवयीन असल्याचा दावा त्याच्या आजीने केला आहे. त्या म्हणाल्या, पोलिसांनी त्याला अटक केली नसून मी स्वतः त्याला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेले होते. एवढेच नाही तर, आरोपीच्या आजीने दावा केला आहे, की ज्यावेळी घटना घडली तेव्हा तो तिथे उपस्थित नव्हता. मात्र, त्यांनी मान्य केले आहे, की त्याच्या मित्रांनी त्याला शक्ती मिलमध्ये बोलावून घेतले होते. तिथे तरुणीवर बलात्कार होत असल्याचे पाहिल्यानंतर त्याने तिथून पळ काढला. तो अल्पवयीन असल्याता दावा करणा-या त्याच्या आजीने जन्माचा दाखलाही माध्यमांच्या प्रतिनिधींना दाखवला आहे. त्यात जन्मतारखेच्या ठिकाणी खाडाखोड करण्यात आलेली आहे.

या प्रकरणात आता तिसरी अटक झाली आहे. तिस-या आरोपीला महालक्ष्‍मी परिसरातूनच अटक करण्‍यात आली. एका मित्राच्‍या घरी तो लपला होता. त्‍याच्‍याबाबत सविस्‍तर माहिती अद्याप दिलेली नाही. मात्र, वरिष्‍ठांनी अटकेला दुजोरा दिला आहे.

शनिवारी लोकसभेत मुंबई गँगरेपवरुन वातावरण तापले होते. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सोमवारी या प्रकरणी लोकसभेत निवदेन करणार आहेत. मात्र, समाजवादी पक्षाचे सदस्य नरेश अग्रवाल वादग्रस्त वक्तव्याने अडचणीत सापडले आहेत. ते म्हणाले, की कायद्याने बलात्काराच्या घटना थांबवता येणार नाही. टीव्ही वरील कार्यक्रम अश्लिल असतात असा आरोप करत, मुलींचे कपडे व्यवस्थित असले पाहिजे, महिलांनी आपल्या पेहरावातही बदल करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. लालू यादव यांनी मुलींना लांबचा प्रवास करायचा असेल किंवा कुठे लांब जायचे असेल तर त्यांनी तशी माहिती पोलिसांनी दिली पाहिजे, विशेषतः महिला पत्रकारांनी, असे म्हटेल आहे.

गँगरेप प्रकरणातील एका आरोपीला भोईवाडा कार्टात आज (शनिवार) हजर करण्यात आले. त्याला 30 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दुस-या आरोपीला थोड्याच वेळात कोर्टासमोर आणले जाणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोर्टाच्या बाहेर निदर्शने केली.

दरम्यान, मुंबईतील शक्ती मिल कंपाउंडमध्ये गँगरेपची शिकार झालेल्या महिला छायाचित्रकाराने आरोपींना जन्मठेपेच्या शिक्षाची मागणी केली आहे. पीडित तरुणीवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. यावेळी तिचे कुटुंबिय जेव्हा पहिल्यांदा तिला भेटले तेव्हा तिने, माझ्यावर शारीरिक आणि मानसिक आघात करणा-यांना जन्मठेपेपेक्षा कमी शिक्षा झाली नाही पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. (झारखंडमध्ये मृतदेह घेऊन जाणा-या महिला पोलिसावर सामूहिक बलात्कार)

दरम्‍यान, सर्व आरोपींची ओळख पटविण्‍यास पीडित तरुणीने तयारी दाखविली आहे. सर्वसाधारणपणे बलात्‍कार करणा-यांची ओळख पटविण्‍यासाठी पीडित महिला समोर येण्‍याची हिम्‍मत करत नाही. पीडित महिलांना आधीच प्रचंड शारीरिक आणि मानसिक वेदना झालेल्या असतात. आरोपींच्‍या समोर आल्‍यानंतर त्‍या पुन्‍हा भयग्रस्‍त होतात. त्‍यामुळे अनेकदा प्रकरण आरोपींच्‍या बाजुने झुकते. मात्र, या तरुणीने हिम्‍मत दाखविली आहे. तपासात कोणतीही त्रुटी नको म्‍हणून आरोपींची ओळख पटविण्‍यासाठी ती तयार झाली आहे. एकदा सर्व आरोपी पकडल्‍या गेले की ती सर्वांची ओळख पटविणार आहे. तिच्‍यासोबतच तिचा सहकारीही आरोपींची ओळख पटविण्‍यास तयार आहे. पीडितेवर बलात्‍कार करताना आरोपींनी त्‍यालाही बेदम मारहाण केली होती.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी सामूहिक बलात्कार प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून दोघांची ओळख पटली आहे. तसेच आणखी एकाला शनिवारी पहाटे अटक करण्यात आले आहे. विजय जाधव असे आरोपीचे नाव आहे.

सामूहिक बलात्कार प्रकरणी एक खळबळजनक खुलासा समोर आला आहे, सुत्रांच्या माहितीनुसार आरोपी मोहम्मद अब्दूल उर्फ चांद याच्या मोबाईलमध्ये पोर्न क्लिप सापडली आहे. बलात्कारावेळी तो ती क्लिप पाहात होता आणि पीडितेलाही पाहाण्याची बळजबरी करीत होता. त्याच वेळी तरुणीच्या आईचा फोन आला होता. त्या नराधमांनी तिथेच पडलेल्या बिअरच्या फुटलेल्या बाटलीने मारण्याचा धाक दाखवून आईला सर्वकाही ठिक असल्याचे सांगण्यास तिला सांगितले.