आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘समृद्धी’साठी ना विकास क्षेत्रालाही पाचपट मोबदला; सहमती देणाऱ्यासच लाभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादित करण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे. परंतु अनेक ठिकाणी नागरिक, शेतकरी जमीन देण्यास तयार नसल्याने भूसंपादनाचे काम धीम्या गतीने सुरू आहे. बागायती शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला मिळत असल्याने तसाच मोबदला ना विकास क्षेत्रातील जमिनीला जावा, अशी इतर नागरिकांची मागणी पाहता राज्य सरकारने आता अशा जमिनीसाठीही पाचपट मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या  प्रस्तावाला नुकतीच  मंजुरी दिली.


समृद्धी महामार्ग मुख्यमंत्री फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ४६ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असलेला ७०० किमी लांबीचा हा महामार्ग तयार झाल्यानंतर केवळ ८ तासांत मुंबई-नागपूर अंतर कापले जाणार असल्याने या भागाचा विकास होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांना आहे. त्यासाठी बाजारभावापेक्षा जास्त रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला. डिसेंबरपर्यंत भूसंपादनाचे काम पूर्ण करून महामार्गाचे काम सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न असला तरी सहा महिन्यांत अजून १० हजार हेक्टरपैकी  १० टक्केही जमीन संपादित झालेली नाही. 

 

जमीन संपादन होणार सुलभ
सरकारच्या या निर्णयामुळे आता जमीन संपादित करणे सुलभ होणार आहे. ना विकास क्षेत्रातील कृषी जमिनींना पाचपट मोबदला दिला जाणार असला तरी ती जमीन नपा वा मनपाच्या हद्दीतील नसावी आणि तेथे कोणतेही विकास काम प्रस्तावित नसावे, ही अट आहे. कारण अशा जमिनीचा बाजारभाव अगोदरच जास्त आहे.

बातम्या आणखी आहेत...