मुंबई - भाजपने आता शिवसेनेला सत्तेत एक तृतीयांश वाटा देऊन सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेची उपमुख्यमंत्रिपदाची मागणी मात्र धुडकावली आहे. दोन दिवसांत तिढा सुटून पुढच्या आठवड्यात मनोमिलन जाहीर होणे शक्य आहे. सूत्रांनुसार शिवसेनेने उपमुख्यमंत्रिपदासह १३ मंत्रिपदे मागितली आहेत. मात्र एक तृतीयांश वाटा म्हणजे ३२ पैकी १० मंत्रिपदे शिवसेनेला देण्याची भाजपची तयारी आहे. यात पाच कॅबिनेट व पाच राज्यमंत्रिपदे आहेत.