आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉकपिटमध्ये धुरामुळे विमान मुंबईला परतले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भुवनेश्वरला जात असलेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या कॉकपिटमध्ये धूर निघत असल्याचे एकच हलकल्लोळ उडाला. यामुळे विमानाला मुंबईला परतून इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. विमानात एकूण १५५ प्रवासी होते.  
 
एआय- ६६९ या विमानाने दुपारी २.१५ वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाहून उड्डाण केले होते. काही वेळेनंतर पायलटने आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली. दुपारी २.५० वाजता विमान मुंबईला परतले. धुराचे कारण शोधले जात आहे. एअर इंडियाने दुसऱ्या िवमानाने प्रवाशांना भुवनेश्वरला रवाना केले.
बातम्या आणखी आहेत...