आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांची अत्‍यंत दुर्मिळ 15 चित्रे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटिश म्युझियममध्‍ये असलेले चित्र. - Divya Marathi
ब्रिटिश म्युझियममध्‍ये असलेले चित्र.
मुंबई- मुंबईच्‍या जहॉंगीर कला दालनात छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या आयुष्‍यावर आधारित तैलचित्रांचे प्रदर्शन भरवण्‍यात आले. यातील काही चित्रांमध्‍ये शिवरायांच्‍या हातात तलवारीऐवजी धनुष्‍यबाण दाखवण्‍यात आला. त्‍यामुळे स्‍वाभिमानी संभाजी ब्रिगेड या संघटनेने या प्रकाराचा निषेध करत कला दालनासमोर निदर्शने केली. महाराजांना अवतारी पुरूष दाखवण्‍याचा प्रयत्‍न या चित्रांमधून करण्‍यात आल्‍याचा आरोप यावेळी करण्‍यात आला. महाराजांची खरी चित्रे लोकांपर्यंत जायला हवी. म्‍हणून या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला शिवाजी महाराजांची अत्‍यंत दुर्मिळ अशी चित्रे दाखवत आहोत. कदाचित ही चित्रे आपण पाहिली नसतील.
महाराजांची बरीचशी चित्रे विदेशात..
छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक चित्रकारांनी काढलेली देखणी चित्रे आज उपलब्ध आहेत. त्‍यापैकी बरीचशी चित्रे ही विदेशात आहेत. महाराजांच्‍या काही चित्रांवर तारखांचा उल्‍लेख नाही. मात्र, संग्रह करणा-याने केलेल्‍या लिखाणाच्‍या आधारावर या चित्रांचा काळ ठरवतो येतो. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com या संग्रहातून आपल्‍याला महाराजांची विविध चित्रे दाखवणार आहे.
- 1672 च्या दरम्‍यान मनुचीने भारतातील 56 राजे-बादशाहांची चित्रे तयार केली.
- ही चित्रे त्‍यांनी मीर महम्मद कडून तयार केली होती.
- या संग्रहात एक चित्र शिवाजी महाराज यांचेही होते.
- मनुचीने घेतलेले चित्र सध्‍या पॅरीसमध्‍ये आहे.
- शिवाजी महाराज यांची विविध चित्रे विदेशात आहेत.
- राजस्‍थानमध्‍ये राजपुती शैलीत काढलेले चित्र, टाटा कलेक्शनमधील, फ्रांसच्या राष्ट्रीय
ग्रंथालयातील व बर्लिन स्टेट लायब्ररीतील चित्रे प्रसिद्ध आहेत.
1) वरील चित्र ब्रिटिश म्युझियममधील आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, शिवरायांची अत्‍यंत दुर्मिळ अशी चित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...