आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The President, Pranab Mukherjee Unveiled Statue Of Chhatrapati Shivaji Maharaj

राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते ठाण्यात शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कळव्यात आज सकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड, ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक, कामगार मंत्री हसन मुश्रिफ, विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे आणि खासदार आनंद परांजपे हे मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कालपासून महाराष्ट्राच्या तीन दिवसीय दौ-यावर आहेत. काल सायंकाळी ते मुंबईत दाखल झाले होते. आज ते मुंबई व ठाण्यातील कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. त्यानंतर आज सायंकाळी ते पुण्यात दाखल होत आहे.